ताज्या घडामोडी

औंढोलीतील ग्रामदैवत श्री वाघोबा व श्री जाखमाता देवीचा उत्सव साधेपणाने संपन्न

उत्सवात अखंड हरिनाम सप्ताहामधे प्रवचन व कीर्तने संपन्न

लोणावळा : औंढोलीतील ग्रामदैवत श्री वाघोबा व श्री जाखमाता देवीचा उत्सव साधेपणाने संपन्न झाली. यावेळी उत्सवात तीन दिवस अखंड हरिनाम सप्ताहामधे प्रवचन व कीर्तने संपन्न झाली. ता. ५ रोजी सकाळी वारकरी व मान्यवरांचे हस्ते पूजा , अभिषेक व कलश पूजन , वीणा पूजन झाले. सायंकाळी हरिपाठ व ह.भ.प.सदिपान महाराज शिंदे (शिलाटणे ) यांचे प्रवचन व राञी ७ ते ९ ह.भ.प. गणेश महाराज गोणते यांचे कीर्तन झाले. राञी १० नंतर हरिजागर झाला. रोज पहाटे चार ते सात काकडाआरती श्री गणपती व हनुमान मंदिरात पार पडला. ता.६ रोजी ह.भ.प. बाबाजी महाराज काटकर यांचे सायंकाळी प्रवचन व राञी ७ ते ९ ह.भ.प.सौ.मोनिकाताई फाटक (मांडेकर ) यांचे कीर्तन झाले.

ता.७ रोजी सकाळी श्री शिवमंदिरापासून दिंडी काढण्यात आली. सकाळी दहा ते १२ ह.भ.प.तुषार महाराज दळवी यांचे काल्याचे कीर्तन झाले. यावेळी याल तरी यारे मागे , या गवळणीवर काल्याचे छञपती शिवाजीमहाराज यांचे पुतळ्यासमोर कीर्तन केले. महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली.

तसेच दुपारी श्री वाघोबा व श्री जाखमाता देवीचे मुखवटा असलेल्या पालखीची मिरवणूक टाळ मृदूंगाच्या व ढोल ताशांच्या तालात काढण्यात आली. वेताळमहाराज यांची काठी व पालखी यांची मिरवणूक वेताळ महाराज भेट घेवून श्री वाघोबा मंदीर ते श्री जाखमाता मंदीर आणि ग्रामप्रदक्षिणा असा राञी बारा पर्यत मिरवणूक तसेच भजनाचा कार्यक्रम झाला. गावातील आबालवृध्द , तरूण व महिला यांचेतर्फे सर्वजण यात सहभागी झाले होते.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!