ताज्या घडामोडी

विनोद सम्राट दादू इंदुरीकर यांची जन्मशताब्दी महाराष्ट्र शासनाने साजरी करावी

मुंबई : विनोद सम्राट दादू इंदुरीकर यांची जन्मशताब्दी महाराष्ट्र शासनाने साजरी करावी असे आवाहन विनोद सम्राट दादू इंदुरीकर प्रतिष्ठानतर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार संघातील वार्ताहर परिषदेत आज करण्यात आले.

विनोद सम्राट दादू इंदुरीकर यांनी त्यांच्या गाढवाचं लग्न या वगनाट्य द्वारे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. या श्रेष्ठ विनोद सम्राट याचे वर्णन ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी महाराष्ट्राचा पॉल मुनी असे केले होते. अशा विनोद सम्राटाची जन्मशताब्दी 2022 मध्ये महाराष्ट्र शासनाने साजरी करताना राज्याच्या सहा महसूल विभागांमध्ये दादू इंदुरीकर यांच्या वगनाट्य आणि लोकनाट्याचे महोत्सव आयोजित करावेत अशी मागणी या वार्ताहर परिषदेत विनोद सम्राट दादू इंदुरीकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ. प्रकाश खांडगे यांनी केली.

दादू इंदुरीकर यांच्या पुणे जिल्ह्यातील इंदुरी या गावी त्यांचे उचित स्मारक उभे रहावे तेथे लोकसाहित्य लोककला तमाशा कलेचे अद्ययावत ग्रंथदालन उभे रहावे तमाशा कलावंतांसाठी रंगमंच असावा तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या शिल्पकार योजनेखाली दादू इंदुरीकर यांचे चरित्र प्रकाशित व्हावे अशी मागणीही श्री खांडगे यांनी केली. तमाशा कलावंतां च्या मुलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे निवासी आश्रम शाळा प्रतिष्ठान च्या माध्यमातून उभी रहावी त्याला शासनाने सहकार्य करावे अशी मागणी उपाध्यक्ष डॉ. गणेश चंदनशिवे यांनी याप्रसंगी केली.

वगसम्राट दादू इंदुरीकर यांच्या काळातील ज्येष्ठ तमाशा कलावंतांचे ध्वनि चित्र मुद्रण मुलाखतींच्या स्वरूपात व्हावे व पारंपरिक तमाशाचा अनमोल ठेवा जतन व्हावा अशी मागणी या वार्ताहर परिषदेत ज्येष्ठ कादंबरीकार आणि प्रतिष्ठानचे विश्वस्त विश्वास पाटील यांनी केली.महाराष्ट्र शासनाने राज्य चित्रपट महोत्सव राज्य लावणी महोत्सव राज्य तमाशा महोत्सव अखिल भारतीय साहित्य संमेलन अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन या धरतीवर दादू इंदुरीकर प्रतिष्ठान तर्फे आयोजित होणाऱ्या लोककला महोत्सवासाठी भरीव आर्थिक सहाय्य करावे अनुदान द्यावे अशी मागणी प्रतिष्ठानचे विश्वस्त प्रभाकर होवाळ सोपान खुडे आणि खंडू गायकवाड यांनी केली. परदेशी महाराष्ट्र शासनाने सांस्कृतिक पुरस्कारांच्या यादीत वगसम्राट दादू इंदुरीकर पुरस्कार देखील जाहीर करावा अशी मागणी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सुरेश धोत्रे अॅड. रंजना भोसले राजेंद्र सरोदे उपाध्यक्ष संजय चव्हाण यांनी केली विनोद सम्राट दादू इंदुरीकर लोककला प्रतिष्ठान वर डॉ. रामचंद्र देखणे, श्री ज्ञानेश महाराव आणि साहेबराव काशीद हे मान्यवर देखील कार्यरत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!