ताज्या घडामोडी

ग्रामसुरक्षा दल,प्रत्येक शहराचा आधार – मधुकर सावंत वरीष्ठ पोलीस निरीक्षक

तळेगाव : ग्रामसुरक्षा दल प्रत्येक शहराचा आधार आहे त्याला सर्व सामाजिक संस्थांनी सर्वतोपरी सहकार्य करावे व शहराचा क्राईम हा शून्य टक्क्यावर आणावा असे प्रतिपादन मा मधुकर सावंत ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन यांनी केले.

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी च्या वतीने ग्रामसुरक्षा दलास एक किलोमीटर पर्यंत लांबी असलेल्या 35 पेट्रोलिंग टॉर्च सप्रेम भेट देण्यात आल्या त्याप्रसंगी श्री सावंत बोलत होते.

रोटरी क्लब तळेगाव दाभाडे सिटीचे सन 2022/23 चे अध्यक्ष रो दीपक फल्ले यांच्या वाढदिवसानिमित्त इतर खर्चाला फाटा देत हा स्तुत्य उपक्रम घेतल्या बद्दल त्यांनी खूप शुभेच्छा दिल्या.असेच सहकार्य ग्राम सुरक्षा दलास तळेगाव शहरातील इतर संस्थांनी करावे असे आवाहन मा मधुकर सावंत यांनी केले.

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी ग्रामसुरक्षा दला बरोबर अग्रेसर राहून त्यांच्या अडचणीत नेहमी पुढाकार घेईल असे प्रतिपादन दीपक फल्ले यांनी केले.
स पो निरीक्षक दुर्गानाथ साळी साहेब, रो दिलीप पारेख व यांनी मनोगत व्यक्त केले.

स पो निरीक्षक महेश मतकर, स्माईल फाउंडेशनचे हर्षल पंडित, ज्येष्ठ पत्रकार महादेव वाघमारे संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे, मनोज ढमाले, संजय मेहता, ऍड विनय दाभाडे , शाहीन शेख, शरयू देवळे, रेश्मा फडतरे, वैशाली खळदे, रिजवान शेख हे प्रमुख व ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष रो राजेश गाडे पाटील यांनी केले तर स्वागत माजी अध्यक्ष संतोष शेळके यांनी व सूत्रसंचालन किरण ओसवाल यांनी तर आभार रो प्रशांत ताये यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रो संतोष लोणकर, अविनाश नागरे, सुनील माहाजन,तानाजी मराठे,बाळासाहेब रिकामे,संजय चव्हाण व राजेंद्र कडलक यांनी प्रयत्न केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!