ताज्या घडामोडी

छञपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध पक्ष, संघटना यांच्यावतीने उत्साहात साजरी

लोणावळा : छञपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसार जयंती विविध पक्ष संघटना यांचेतर्फे उत्साहात साजरी करण्यात आली. लोणावळा नगरपरिषदेच्या वतीनै छञपती शिवाजी महाराज यांचे आश्वारूढ पुतळ्यास आकर्षक फुलांची सजावाट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

लोणावळा नगरपरिषदेचे प्रशासकीय आधिकारी सोमनाथ जाधव यांचे हस्ते छञपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा , महात्मा गांधी , संत गाडगेमहाराज आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार आर्पण करण्यात आले. काँग्रेसचे वतीने तसेच गवळीवाडा येथील श्रीराम क्रीडा मंडळाचे वतीने शहरातून छञपती शिवाजी महाराज यांची भव्य मिरवणूक रथामधून काढण्यात आली. छञपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार शहर अध्यक्ष प्रमोद गायकवाड , माजी नगरसेवक व प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस निखिल कविश्वर यांचे हस्ते पुष्पहार आर्पण करण्यात आला.यावेळी काँग्रेसचे सेवादलाचे शहराध्यक्ष सुनिल मोगरे , माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिर्के , माजी नगरसेवक दिलीप लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.

आर पी आय आठवले गटाचे वतीने छञपती शिवाजी महाराज आश्वारूढ पुतळ्यास व भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर , महात्मा फुले ,महात्मा गांधी तसेच गाडगेमहाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार मान्यवरांचे उपस्थितीत आर्पण करण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे , जिल्हा सरचिटणीस गणेश गायकवाड , माजी उपनगराध्यक्ष दिलीपशेठ दामोदरे , शहराध्यक्ष कमलशील म्हस्के आदी उपस्थित होते . रेल्वेकामगार सेवानिवृत्त संघटना यांचेवतीने , मेहतर समाज , तसेच हमाल पंचायत मावळ तालुका यांचेतर्फे छञपती शिवाजी महाराज यांचे आश्वारूढ पुतळा आणि महापुरूषांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A)राष्ट्रीय अध्यक्ष मा दिपक भाऊ निकाळजे यांचे मार्गदर्शनाखाली आज छत्रपति शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले, तसेच सर्व महापुरूषांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.या वेळी पुणे जिल्हा युवक आध्यक्ष मा अंकुशभाऊ चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष विनोद वानखेडे, लोणावळा शहर आध्यक्ष महेंद्र शिंदे, उपाध्यक्ष कैलाशजी मोरे, उमेशजी कांबळे, सुभाष सोनवणे, आजित पवार, राहूल मोरे, मिलिंद जाधव, विनोद साबळे, सुभाष रेड्डी,शिल्पाकाई जाधव, सोनालाताई लोहिरे, वर्षाताई उमक, मनिषाताई उमक, पुजा तळेकर, निता मोरे, आदी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!