ताज्या घडामोडी

च-र्होली येथील श्री वाघेश्वर विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी केली आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अनाथ मुलांना वस्तुरुपी मदत

चिंचवड  : पालवी ट्रस्ट व्दारा संचलित आनंदग्राम बालकाश्रम नारायणपुर या संस्थेला श्री वाघेश्वर विद्यालय च-होली बु. येथील मार्च १९८५ च्या माजी विद्यार्थ्यांनी अन्नधान्य व किराणा साहित्य मदत स्वरुपात दिले. संस्थेचे संस्था चालक ह.भ.प. तेजस महाराज कोठावळेकर यांनी ही मदत स्विकारली. त्यांनी माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले.

सदर कार्यक्रमाला राजेंद्र आढाव, महमंदशरीफ मुलाणी, शरद तापकीर, सुर्यकांत तापकीर, शहाजी तापकीर, चंद्रकांत निकम, दिपक बुर्डे उपस्थित होते.

कोविड सारख्या अवघड काळात सुध्दा आपण व इतर नागरीकांनी संस्थेला फार मदत केली. त्याबद्दल सर्वांचे ऋण व्यक्त केले. संस्थाचालक ह.भ.प.ह्यांनी संस्थेबद्दल माहिती देताना सांगितले. संस्थेत ऊस तोडणी कामगार, विटभट्टी कामगार, गरिब कुटुंबातील निराधार मुले तसेचआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आनंदग्राम गुरुकुल ही संस्था सासवडजवळील पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी नारायणपुर येथे गेली 6 वर्ष झाले काम करत आहे. मुलांना राहणे, खाणे, शिक्षण मोफत दिले जाते. सोबत कॉम्प्युटर, योगा, संगीत, संस्कृत, वारकरी सांप्रदायिक हरिपाठ, श्रीमद्भगवद्गीता, पखवाज, किर्तन व प्रवचण शिकवले जाते. आंघोळीसाठी गरम पाणि या सुविधा देण्यात येते. त्यांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी हे काम अविरतपणे चालु आहे.

छोट्या खेड्यातील गरजू मुलांना, कुटुंबाला याची माहिती नसते. त्यामुळे मुलांचे शिक्षण होत नाही. आपण आपल्या परिसरातील गरजवंत मुलांच्या कुटुंब प्रमुखाबरोबर संपर्क करा, असे आवाहन केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!