ताज्या घडामोडी

मनशक्ती दत्तकुटीर येथे ‘ज्ञान प्रेरणा सप्ताह’ अंतर्गत रक्तदान शिबिर

लोणावळा : मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा यांच्या वतीने दत्त कुटीर येथे ‘ज्ञान प्रेरणा सप्ताह’ अंतर्गत दिनांक 21 व 25 फेब्रुवारी या दोन दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच या दोन्ही दिवशी नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येईल.

तसेच 22 व 25 फेब्रुवारी रोजी लोणावळा, खोपोली, तळेगाव ,खारघर व चाकण येथे विद्यार्थी व युवकांसाठी व्यक्तिमत्व विकास व प्रौढांसाठी ताणतणाव व्यवस्थापन या विषयावर विनामूल्य मार्गदर्शन केले जाईल.या रक्तदान शिबिरात नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!