ताज्या घडामोडी

लोणावळ्यात जागृत नागरिक व सर्वपक्षिय पदाधिकारी यांचेकडून सव्वा तास रास्तारोको

एम एस आर डी सी कडून आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगीत.

लोणावळा : लोणावळ्यात जागृत नागरिक व सर्वपक्षिय पदाधिकारी यांचेकडून सव्वा तास रास्तारोको ; एम एस आर डी सी कडून अश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगीत करण्यात आले. लोणावळ्यात सकाळी सात ते राञी नऊ पर्यत अवजड वाहनांसाठी बंदी असणार आहे. तसेच इतर पाच मागण्या मान्य केल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी रास्तारोको स्थगीत केला.

यावेळी मावळचे तहसिलदार मधुसुदन बर्गे , लोणावळा शहरचे पोलिसनिरिक्षक सिताराम डुबल, एम एस आर डी सीचे कार्यकारी अभियंता राकेश सोनवणे , आय आर बी चे समन्वयक जयंत डांगरे , देखभाल व दुरूस्ती विभागाचे श्री पत्की , तसेच उपअभियंता प्रेरणा कोटकर इदी उपस्थित होते. यावेळी लोणावळा शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष जीवन गायकवाड , मावळ तालुका काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष किरण गायकवाड , काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस निखिल कविश्वर , शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, माजी उपनगराध्यक्षा आरोही तळेगावकर , शिवसेना माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, भाजपचे शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल , माजी नगरसेवक बाळासाहेब जाधव, मावळ वार्ता फौडेशनचे आध्यक्ष नंदकुमार वाळंज , कार्याध्यक्ष माजी सभापती जितेंद्र कल्याणजी , लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, माजी नगरसेवक नारायण पाळेकर , भरत उर्फ साहेबराव टकले , माजी नगरसेवक राजूशेठ बच्चे , माजी शिक्षण मंडळ सभापती ज्ञानेश्वर येवले,नवीन भुरट,विनय विद्वांस , माजी नगरसेविका सुवर्णा आकोलकर , संजय आडसुळे, संदिप वर्तक, आदी शेकडो पदाधिकारी व नागरिकांची गर्दी रास्तारोको करीता झाली.

यावेळी श्री.खराडे , श्री.जाधव , श्री.कविश्वर आदींनी अधिकारी यांना धारेवर धरत लेखी आश्वासन दिले तरच आंदोलन स्थगीत करण्याचा इशारा दिल्याने आय. आर. बी चे अधिकारी व एम एस आर डी सीचे अधिकारी यांचेकडून ठोस लेखी अश्वासन देण्यात आले.

एम एस आर डी सीचे कार्यकारी अभियंता यांनी पञात म्हटले आहे की, १) मनशक्ती ते खंडाळा मार्गावर रस्ता दुभाजक व पथदिवे बसविण्याबाबत…सदर मागणीबाबृत पोलिस विभागाबरोबर संयुक्त पाहणी करून पुढील तीन आठवड्यात उपलब्द रुंदीनुसार रस्ता दुभाजक बसविण्याची कार्यवाही आय आर बी मार्फत करण्यात येईल. २) आपघात स्थळावर गतीरोधक बसविण्याबाबत…या रस्त्यावर लांबीनुसार संयुक्त पाहणी करून गतीरोधक(( स्पीडब्रेकर ) बसविण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात येईल.पथकर दिव्यासाठी एन ओ शी मोर्थ कडे पाठपुरावा करण्यात येईल. ३) मनशक्ती ते दुसरा पेट्रोल पंप या रस्त्यावर रूंदीकरण बाबत सुधारणा व रूंदीकरण करणेबाबत सविस्तर प्रस्ताव करण्यासाठी सल्लागार नेमण्याबाबत कार्यवाही morth मार्फत हाती घेतली आहे. सदर रस्ता रूंदीकरण सविस्तर अंदाजपत्रक मंजुरीसाठी morth कडे सादर करून मंजुरी नंतर पुढील निविदाविषयी कार्यवाही पाच महिन्यात सुरू करून काम प्रत्यक्ष सुरू करण्याचे नियोजन आहे. ४) आर पी टी एस ते नाझर टर्न या एस आकाराचे रस्त्याचे ब्लॅक स्पाॕटचे तांत्रिक सर्वेक्षण करून आय आर बी मार्फत काम करण्यासाठी आभियंता जयंत डांगरे ( आय आर बी ) यांचेतर्फे काम तातडीने हाती घेण्याचे अश्वासीत केले आहे. त्यांना दोन दिवसांत परवानगी देण्यात येईल व आरो बाबत खाजगी जागा मालक यांची परवानगी घेण्यात येईल. ५) खोपोली वरून राजमाची खंडाळा मार्गे येणारी जड वाहने लोणावळा शहर पोलिसांचा विषय असल्याने त्यांचेकडून कार्यवाहीसाठी पञ देण्यात आले आसल्याचे या लेखी आश्वासनात म्हटले आहे. या पञाच्या प्रती पोलिस निरिक्षक , जिल्हाधिकारी , आय आर बी यांना दिल्या आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!