ताज्या घडामोडी

पत्रकारांनी अभ्यासपूर्ण पत्रकारिता करताना तंत्रज्ञान समजून घ्यावे – ज्येष्ठ पत्रकार डॉ. एस.के.कुलकर्णी

तळेगाव : पत्रकारांनी अभ्यासपूर्ण पत्रकारिता करताना तंत्रज्ञान समजून घ्यावे असे मत ज्येष्ठ पत्रकार एस. के. कुलकर्णी यांनी तळेगाव येथील पत्रकार कार्यशाळेत व्यक्त केले. बाळ शास्त्री जांभेकर यांच्या 210 व्या जयंतीनिमित्त मावळ तालुक्यातील पत्रकारांसाठी तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघाच्या वतीने योगीराज हॉल येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले, पत्रकारांनी आधुनिक तंत्रज्ञान समजून घेत अभ्यासपूर्ण पत्रकारिता करावी. नवीन आधुनिक साधनांचा व्यवस्थित वापर करावा. तसेच समाजामध्ये सांधण्याचे काम पत्रकारांनी करावे. बातमी मागची बातमी शोधणे पत्रकाराचे काम आहे.

माजी राज्यमंत्री संजय भेगडे यांच्या अध्यक्षतेखाली व मावळचे आमदार सुनिल अण्णा शेळके यांच्या हस्ते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.

उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार सुनिल शेळके म्हणाले, तालुक्यातील पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील राहील. तर माजी मंत्री संजय भेगडे म्हणाले, पत्रकारांनी तळागाळातील जनतेच्या समस्या शासनासमोर मांडाव्यात. पत्रकारांना मार्गदर्शन करताना पत्रकारांनी बातमीदारीतून समाजाला जागृत करण्याची गरज असते असे मत तांबट यांनी मांडले.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार डॉ. एस. के. कुलकर्णी, डॉ. प्राध्यापक संजय तांबट, ज्येष्ठ पत्रकार सुरेश साखळकर,पञकार संघाचे अध्यक्ष मनोहर दाभाडे, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी,मावळ तालुका भाजपचे अध्यक्ष रवींद्र भेगडे ,माजी नगरसेवक गणेश खांडगे, यादवेंद्र खळदे,वैशाली दाभाडे ,अरुण भेगडे ,भाजपा शहराध्यक्ष रवींद्र माने, सुहास गरुड, श्रीकृष्ण पुरंदरे, संदीप पानसरे, डॉ. सत्यजित खांडगे यांच्यासह तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष मनोहर दाभाडे यांनी केले. तर प्रास्ताविक संस्थापक सुरेश साखळकर यांनी केले. अतुल पवार यांनी सूत्रसंचालन केले व पत्रकार सोनबा गोपाळे गुरुजी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार सुनील वाळुंज. बी.एम .भसे तात्यासाहेब धांडे, प्रभाकर तुमकर, श्रीकांत चेपे, मच्छिंद्र बारवकर यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी ज्येष्ठ छायाचित्रकार रमेश जाधव गुरुजी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!