तळेगावातील लॅटिस सोसायटीत शिवजयंती उत्साहात साजरी
तळेगाव : या वर्षी तळेगाव दाभाडे येथील लॅटिस सोसायटीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती शनिवार (दि.19 फेब्रुवारी) रोजी उत्साहात साजरी करण्यात आली .
सकाळी ठीक 10 वाजता महाराज्यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापणा व ज्योत प्रज्वलन करण्यात आले.तरसायंकाळी 4:30 वाजता जिवंत शिवाजी महाराजांचा देखावा साकारण्यात आला. त्यानंतर 5 ते 7 रुद्राक्ष ढोल पथक यांची मानवंदना देण्यात आली.सायंकाळी 7 ते 8 शिव व्याख्याते प्रमोद बोराडे सर यांचे व्याख्यान झाले.राञी 8 ते 9 सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
लॅटिस सोसायटी मधील सर्व शिवभक्तानी सहभागी होऊन आपला कार्यक्रम यशस्वी केला.विशेषम्हणजे आपल्या लॅटीस सोसायटीमध्ये देशांमधील वेगवेगळ्या राज्यातील रहिवासी असल्यामुळे त्यांनी देखील त्यांच्या प्रांतातील वेशभूषा केली होती .कार्यक्रमानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला .ह्या सोहळ्यासाठी लॅटीस सोसायटी मधीलछत्रपती शिवाजी महाराज उत्सव समिती यांनी विशेष परिश्रम घेतले.