ताज्या घडामोडी

बँक आॕफ बडोदा च्या ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन शाखाधिकारी मनीष सिन्हा यांचे हस्ते संपन्न

लोणावळा : बँक आॕफ बडोदाच्या ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन शाखाधिकारी मनीष सिन्हा यांचे हस्ते फीत कापून व दीपप्रज्वलनाने व प्रतिमापूजन करून संपन्न झाले. महालक्ष्मी हाॕटेलचे आवारात गवळीवाडा, लोणावळा येथे काॕर्नरला असलेल्या या ग्राहक सुविधा केँद्राचे उद्घाटन प्रसंगी शामदासठाकूर आणि आशिश ठाकूर हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

यावेळी बँकेचे आधिकारी श्रीकांत कानडे , मंगेश राऊत , विशाल वाघ, प्रतिक रंगारी , प्रियांका शेळके , मनोहर वाघमारे आदी उपस्थित होते. यावेळी धिरज जाधव, अभिषेक धोञे , सागर वाघमारे आदी उपस्थित होते. यावेळी श्री .सिन्हा यांनी नागरिकांच्या सेवेसाठी असलेल्या या सुविधा केंद्रात बँकेच्या खातेदारांच्या आडीअडचणी दूर होतील.त्यांना जलद सेवा मिळेल ,असे या प्रसंगी सांगितले. या सुविधा केंद्राचे संचालक महेश जीवननवर आणि संचालिका भारती जीवननवर आदींनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!