ताज्या घडामोडी

नगरपरिषद निवडणुकांचे बिगुल वाजले ; प्रभागरचना कार्यक्रम जाहीर

लोणावळा : राज्यातील नगरपरिषदांसाठीचे निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत. आयोगाकडून नगर परिषदांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

तळेगाव दाभाडे व लोनावळा नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीचा प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे 2 मार्च 2022 रोजी मुख्याधिकार्‍यांन मार्फत सादर केला जाणार आहे. याचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया सुरू केली.

मुख्याधिकारी 2 मार्च 2022 पर्यंत जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव सादर करतील. या प्रस्तावावर जिल्हाधिकारी 7 मार्च रोजी मान्यता देतील. त्यानंतर प्रारुप प्रभाग रचना प्रभाग दर्शक नकाशे आधिसुचना कलम त्यानुसार रहिवाशांच्या माहितीसाठी व हरकती सूचना मागविण्यासाठी वृत्तपत्र स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी कार्यालय आणि नगर परिषदांच्या वेबसाईटवर जिल्हाधिकारी 10 मार्च रोजी प्रसिद्ध करतील.

10 ते 17 मार्च पर्यंत नागरिकांना प्रभाग रचनेवर हरकती नोंदविता येतील.प्राप्त हरकतींवर व सूचनांवर जिल्हाधिकारी 22 मार्च रोजी सुनावणी देतील.25 मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या हरकती व सूचनांच्या अनुषंगाने अभिप्राय देऊन राज्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे अहवाल पाठवावा लागणार आहे .1 एप्रिल 2022 रोजी आयोग अंतिम प्रभाग रचनेला मान्यता देईल तर अधिनियमातील कलम त्यानुसार अंतिम अधिसूचना वृत्तपत्रात व स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी कार्यालय नगरपरिषद यांच्या वेबसाईटवर जिल्हाधिकारी 5 एप्रिल रोजी प्रसिद्ध करतील.

 

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!