ताज्या घडामोडी

लोणावळ्यात महात्मा गांधी आर्धपुतळ्यास चष्माच नाही

लोणावळा : येथील नगरपरिषदेच्या इमारतीसमोर उभारलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पुतळ्यास चष्माच नसल्याने शहरात दबक्या आवाजात चर्चा आहे.

शासकीय नियमानुसार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचेसह आधुनिक संत गाडगेमहाराज , महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा तसेच भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे बसविण्यात आले आहेत.यांचे उद्घाटन विरोधीपक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे हस्ते ता.३ डिसेंबर रोजी झाले आहे.

लोणावळा नगरपरिषदेच्यावतीने महात्मा फुले भाजीमंडईसमोर महात्मा फुले यांचा पुतळा आहे. भविष्यात मंडईपुढे आसलेला पुतळा मंडईचे काम चालू झाल्यावर हटविण्यात येईल,त्यासाठी प्रोविजन आगाऊ उपाययोजना म्हणून नवीन पुतळा इमारतीचे समोर बसविला आहे. महात्मा गांधी यांचे पुतळ्यास चष्मा नसल्याने तो वेगळा दिसतो. पुतळे बसविणारी ठेकेदार आणि लोणावळा नगरपरिषदेच्या प्रशासनाने या पुतळ्यांचे मिनिट व पोलिसांकडून रितसर पंचनामे करून घेणे गरजेचे असल्याचे जाणकारांनी सांगितले .

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!