ताज्या घडामोडी

लोणावळा नगरपरिषद इमारतीचे पर्यटनस्थळांची छायाचित्रे लावून सुशोभिकरण सूरु

लोणावळा : लोणावळा नगरपरिषद इमारतीच्या रंगरंगोटीनंतर आता लोहगड,विसापूर , तिकोना , तुंग,कोराईगड , राजमाची , नागफणी , या दुर्ग किल्यासह विविध धरणे , आणि पाँईंट ची छायाचित्रे लावल्याने सुशोभिकरणाचे काम देखणे झाले आहे. या ठिकाणी इमारतीचे मधोमध असलेल्या जागेमधे कुणी पडू नये म्हणून भक्कम जाळी लावली आहे. त्यामुळे लोणावळा नगरपरिषदेमधे येणाऱ्या बाहेरगावच्या ठेकेदार , पर्यटक , तसेच कर भरणारे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

आत्यंत दुर्मिळ छायाचित्रे भिंतीवर लावल्यामुळे वेगळेच गेटअप आले आहे. गवळीवाडा येथील महावीर चौक परिसरात झाडांना बोलके करणारे रंग तसेच रेल्वेवरील पुलावरील भिंतीवर पक्ष्यांची चिञे रेखाटली आहे , त्यामुळे शहरात सौदंर्य वाढीसाठी मदतच झाली आहे..स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मधे नगरपरिषद तयार आसल्याने ही कामे वेगात चालू आहेत. लोणावळा नगरपरिषद निवडणुकीचा प्रभाग आराखडा मार्च मधे होऊन ता.१० एप्रिल पर्यत हे काम पूर्ण होईल व एप्रिल मे मधे पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम चालू होणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!