ताज्या घडामोडी

पुणे जिल्हा परिषदेच्या गुणवंत शिक्षक पुरस्काराने मनिषा सोनवणे सन्मानित

पुणे : मावळ तालुक्यातील परंदवडी शाळेतील शिक्षिका मनिषा सोनवणे यांस महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री.अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते नुकताच पुणे जिल्हा परिषदेचा ‘गुणवंत शिक्षक पुरस्कार’ प्राप्त झाला.

पुणे येथे झालेल्या सन्मान सोहळ्यास पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे,उपाध्यक्ष रणजित शिवतरे,पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर,मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद,शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड इ.मान्यवर उपस्थित होते.

मनिषा सोनवणे या उपक्रमशील अध्यापिका असून डाएटच्या LLRP उपक्रमांत मराठी विषयासाठी त्यांनी राज्यस्तरावर सक्रिय सहभाग घेतला आहे.कोविड काळात विद्यार्थी शिक्षण प्रवाहापासून वंचित राहू नये यासाठी यूट्यूब चँनलच्या माध्यमातून व्हिडीओ निर्मिती करुन अॉनलाईन पद्धतीने अध्यापन केले होते.’माझा वर्ग माझा उपक्रम’ या अंतर्गत त्यांनी बहुभाषिक विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी गोडी निर्माण करुन शिक्षण प्रवाहात आणले.SR दळवी फाऊंडेशनच्या माध्यमातून त्या सामाजिक कार्यातही अग्रेसर असतात.त्यांना मिळालेल्या या पुरस्काराने मावळ तालुक्यातील शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!