ताज्या घडामोडी

तळेगावात रंगणार संत तुकाराम महाराज लोकसंवाद व्याख्यानमाला

तळेगाव  : तळेगाव शहरात सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालय यांच्या विद्यमाने व कै. कल्याणराव उर्फ रामचंद्र जाधव यांच्या स्मरणार्थ संत तुकाराम महाराज लोकसंवाद व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक 3 ते 5 मार्च रोजी होणाऱ्या या व्याख्यानात ख्यातनाम विचारवंत विश्वासराव पाटील ( इतिहासकार तथा साहित्यकार) मी माझे साहित्य पानिपत ते अण्णाभाऊ या विषयावर तर हभप पंकज महाराज गावडे (अध्यात्मिक व प्रेरणादायी वक्ते संत साहित्य व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक) अध्यात्म हे जीवनाचे तत्वज्ञान या विषयावर मार्गदर्शन करतील. तर विजय गोखले (ज्येष्ठ नाट्य व सिने अभिनेते) यांची प्रकट मुलाखत डॉ. विनया केसकर ह्या घेणार आहेत.

नाना भालेराव कॉलनीतील सेवा धाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालयात या व्याख्यानमालेचे सायंकाळी 6:30 वाजता आयोजन करण्यात आले आहे.

व्याख्यानमालेस रसिक श्रोत्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रंथालयाचे अध्यक्ष सुरेश धोत्रे, उपाध्यक्ष निखिल भगत, सचिव डॉ. वर्षा वाढोकर, उपसचिव अतुल पवार,खजिनदार कैलास काळे, सदस्य डॉ. मिलिंद निकम,राजेश बारणे, अमीत बांदल,उर्मिला छाजेड, मीनल कुलकर्णी, पूजा डोळस व ग्रंथपाल बाळासाहेब घोजगे यांनी केले आहे.

आवाज न्युज या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक असून या व्याख्यानांचे आवाज न्यूज फेसबुक पेजवर लाईव्ह करण्यात येईल.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!