लाख मेले तरी चालतील , लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे ! या आर्त हाकेने छञपती संभाजी राजे भारावून गेले
मुंबई : ( आझाद मैदान ): मराठा आरक्षण साठी लढा देणारे , छञपतीं शिवाजी महाराज यांचे वंशज युवराज छञपती संभाजीराजे यांनी आज मावळातील मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळांच्यावतीने आमरण उपोषणाला पाठिंबा देत येथे दिंडी आणून भजन सादर केले . त्यामुळे आपला बी पी लो झालेला , शुगर कमी झालेली जागेवर आली.आपणास या अभंगामुळे चैतन्य मिळाले,मरगळ दूर झाली , लढण्याचे बळ मिळाले , असे यावेळी भाषणातून सांगितले .
मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळांच्यावतीने आज दुपारी संस्थापक अध्यक्ष नंदकुमार भसे, मार्गदर्शक व राजस्थान वारकरी सांप्रदाय मंडळ अध्यक्ष उद्योजक रमेशचंद्रजी व्यास , तसेच मावळ तालुका वारकरी सांप्रदाय आरोग्य समिती अध्यक्ष सुनिल महाराज वरघडे आणि मंडळाचे सचिव रामदास पडवळ ,मृदूंगमणी भिवाजी गायखे, तसेच ह.भ.प.सुभाष महाराज पडवळ,शांताराम गायखे, उपाध्यक्ष दिलीप महाराज वावरे सल्लागार सागर महाराज शेटे आदी वारकरी मंडळांच्यावतीने यावेळी राजे छञपती संभाजीराजे यांना भेटून पाठींबा दिला. यावेळी छञपती संभाजीराजे , त्यांच्या सौभाग्यवती यावेळी उपस्थित होत्या.