ताज्या घडामोडी

महाशिवराञीनिमित्त लोणावळ्यात श्री सिध्देश्वर महादेव मंदिरात गर्दीचा उच्चांक

लोणावळा : महाशिवराञीनिमित्त लोणावळ्यात श्री सिध्देश्वर महादेव मंदिरात गर्दीचा उच्चांक आज रायवूड पार्क परिसरात पहायला मिळाला. श्री सिध्देश्वर देवस्थानचे योग्य व्यवस्थापन व लोणावळा शहर पोलिसांचे चोख बंदोबस्तामुळे महाशिवराञीनिमित्त सुमारे सव्वा ते दीड लाख भाविक भक्तांनी शंभू महादेवाचे दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी पन्नास साठ लाखांची उलाढाल झाली.

लोणावळा शहर व पंचक्रोशितील तीस पस्तीस गावातील महिला , पुरूष या वेळी दर्शनाचा लाभ घेऊन गेली. श्री सिध्देश्वर देवस्थान , सोलापूर चे अध्यक्ष जगदिश रे.निंबाने यांचे मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष धिरजलाल टेलर, खजिनदार गणेश शिवाप्पा गवळी , सदय्य रामलींग संगोळी ,गाभान्ना कुंभार, संतोष चोरडिया ,सोलापूरचे विश्वस्त विश्वनाथ लब्बा आदींनी योग्य तो पहाटेपासूनच आभिषेक , पूजा ,दर्शनरांग यांबरोबर दुकानदारांना नेमून दिलेल्या जागा पाणी व स्वच्छता तसेच लोणावळा शहर पोलिसांकडून सुमारे शंभर पोलिस व गृहरक्षक दल जवान , महिला पोलिस असा बंदोबस्त ठेवल्याने उत्सव शांततेत पार पडला.मंदिरावर आकर्षक रोषणाई व फुलांनी सजावट केली होती.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!