ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घ्याल, तर गाठ आमच्याशी आहे – मावळ भाजप

मावळ : तालुक्यातील शेतकरी बांधवांचे तोडण्यात आलेले शेती पंपाचे वीज कनेक्शन तात्काळ पूर्ववत करावे या संदर्भात आज भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढुन निषेध व्यक्त केला.

कोरोना महामारीमुळे शेतकरी बांधव मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांकडून सक्तीने वीजबील वसुली व वीज कनेक्शन तोडण्याचे काम या महावसुली सरकारकडून सुरू असून ती तात्काळ थांबविण्यात येऊन शेतकऱ्यांना मागील दोन वर्षाचे शेती पंपाचे वीजबील माफ करावे व ज्या शेतकऱ्यांचे शेती पंपाचे वीज कनेक्शन तोडण्यात आलेले आहे त्या शेतकऱ्यांचा तात्काळ वीजपुरवठा पूर्ववत करून घ्यावा जेणेकरून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हाता तोंडाशी आलेलं पीक पाण्याविना वाया जाणार नाही.

जर वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत केला नाही तर शेतकऱ्यांचे पीक वाया जाईल या चिंतेने शेतकरी मानसिक व आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे खचलेला असून हे जर पीक पाण्याविना जळून गेले तर शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट अधिकच गडद होईल व त्यामधूनच शेतकरी आत्महत्या होण्याच्या दुर्घटना देखील होऊ शकतात त्यामुळे असा अनुचित प्रकार घडू नये व शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक पाण्यावाचून वाया जाऊ नये यासाठी तात्काळ वीज पुरवठा पूर्ववत करावा अशी मागणी महावितरण चे उप कार्यकारी अभियंता सूर्यवंशी साहेब यांच्याकडे करण्यात आली

शेतकऱ्यांचे शेती पंपाचे विजकनेक्शन तात्काळ पूर्ववत केले जाईल व ज्या विजबिलामध्ये दुरुस्ती असेल ते दुरुस्त्या करून शेतकऱ्यांना टप्याटप्याने चालु बील भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात येईल हा शब्द दिल्यानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

परंतु शेतकऱ्यांच्या विजबील दुरुस्ती व वीज कनेक्शन जोडले नसल्याचे निदर्शनास आल्यास पुढील 8 दिवसांमध्ये आपल्या कार्यालयासमोर भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा देखील महावितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला.

या आंदोलन प्रसंगी मा.राज्यमंत्री बाळा भाऊ भेगडे,जिल्हाध्यक्ष गणेश तात्या भेगडे,प्रभारी भास्कर आप्पा म्हाळसकर,निवृत्ती भाऊ शेटे,ज्ञानेश्वर भाऊ दळवी,गुलाब काका म्हाळसकर,संदीप भाऊ काकडे,सायलीताई बोत्रे,गणेश भाऊ धानिवले,संतोष भाऊ दाभाडे,सुनील भाऊ चव्हाण,मच्छिंद्र भाऊ केदारी,किरण भाऊ राक्षे,अनंता भाऊ कुडे,नारायण भाऊ बोडके,सूर्यकांत भाऊ सोरटे,अरुण भाऊ कुटे,अमोल भाऊ भोईरकर,नितिन दादा घोटकुले,रवि भाऊ शेटे,बाळासाहेब घोटकुले,संतोष भाऊ बांदल,गणेश भाऊ ठाकर,सागर भाऊ शिंदे,माऊली भाऊ आडकर,यादव भाऊ सोरटे,प्रवीण भाऊ शिंदे यांच्यासह शेतकरी व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!