ताज्या घडामोडी

वराळे गावात 75 लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन उद्घाटन व लोकार्पण सोहळा

वराळे : आमदार सुनील आण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली व सभापती कृषी व पशुसंवर्धन बाबुराव आप्पा वायकर यांच्या जिल्हा परिषद फंडातून वराळे गावात 75 लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन उद्घाटन व लोकार्पण सोहळा आमदार सुनील आण्णा शेळके यांच्या शुभहस्ते तसेच तालुकाध्यक्ष बबनभाऊ भेगडे,कार्याध्यक्ष दीपक हुलावळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.

यावेळी वराळे गावातील सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य,आजी माजी पदाधिकारी व विविध गावचे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

वराळे गावातील भैरवनाथ भजनी मंडळ,इंद्रायणी भजनी मंडळ,शिवकॉलनी भजनी मंडळ या भजनी मंडळांना भजणी साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी बाळासाहेब भानुसघरे,बाळासाहेब गायकवाड,नगरसेवक-संतोष शेळके,प्रवीण काळोखे,अजिंक्य टिळे,सचिन मुर्हे,विठ्ठल मोहिते,अनिल मोहिते,सुयश सांगळे,सुनील दंडेल,adv. अक्षय रौन्धल,भाऊ ढोरे,सुहास वायकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

अगदी कमी दिवसात आप्पांकडे निधीची मागणी करून आप्पांनी 2 महिन्यांच्या आतच निधी टाकून काम ही पूर्ण केली ह्या बद्दल आमदार साहेब व ग्रामस्थांनी आप्पांच्या कामाचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!