ताज्या घडामोडी
महिला दिनानिमित्त तळेगावात आदर्श माता पुरस्कार सोहळा
तळेगाव : तळेगाव शहरात रोखठोक मावळ व साक्षी डायग्नोस्टिक हेल्थकेअर सोल्युशन तसेच साक्षी नोबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श माता पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
समाजापुढे आपल्या कर्तुत्वातून आदर्श निर्माण करणार्या 20 माता भगिनींचा या निमित्ताने गौरव करण्यात येणार आहे.