ताज्या घडामोडी

रोटरीच्या वतीने महिला दिनानिमित्त स्वामी विवेकानंद स्कुलमध्ये शिक्षिकांचा सन्मान

तळेगाव : रोटरी क्लब तळेगाव एमआयडीसी द्वारा जागतिक महिला दिनानिमित्त स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल येथील शिक्षिका यांचा सत्कार मंगळवार दि. 8 मार्च रोजी करण्यात आला.

रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय.डी.सी. या संस्थेद्वारा समाजातील विविध घटकांना प्रोत्साहन देण्याचे कार्य नेहमीच केली जाते. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून क्लब द्वारे स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल येथील सर्व महिला शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचा पुष्प व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला .

आधुनिक युगात महिला सर्व क्षेत्रात अग्रस्थानी आहे. त्यांच्या सामर्थ्यामध्ये वाढ होऊन प्रगती व्हावी असे वक्तव्य श्री. डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मिलिंद शेलार सर यांनी केले.
रो. विल्सेन सालेर यांनी आपल्या कवितेतून महिला कुटुंबाबरोबर समाजाचा व एकूण राष्ट्राचा विकास घडवू शकते असे सांगून सर्व शिक्षकांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या .

याप्रसंगी रो. सचिन कोळवणकर उपस्थित होते..संस्थापक अध्यक्ष रो.संतोष खांडगे यांनी मुलांना संस्कार देऊन समृद्ध भारत बनवण्याची क्षमता महिलांमध्ये आहे; महिला सबलीकरणासाठी रोटरी क्लब सदैव तत्पर राहील अशी ग्वाही देऊन या उपक्रमाचे कौतुक केले.एक यावा असा दिन; ना राहो महिला ‘दीन’ ,रोज असावा ‘महिला दिन’ असा संकल्प करीत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!