ताज्या घडामोडी

कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने मावळात कृषी व पशुपक्षी यांचे भव्य प्रदर्शन

मावळ : कृषी व पशुसंवर्धन विभाग व पंचायत समिती मावळ यांच्यावतीने आयोजित मावळ महोत्सव 2022 अंतर्गत मावळ तालुक्यातील कामशेत येथे कृषी व पशुपक्षी यांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार आहे. 15 मार्च ते 17 मार्च 2022 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 8 वाजे पर्यंत हे प्रदर्शन मावळवासियांसाठी  खुले राहील.प्रदर्शनात पहिला ते पाचवा क्रमांक प्राप्त करणाऱ्या पशुधनास रोख रक्कम बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे. अशी माहिती निमंत्रक बाबुराव वायकर (सभापती कृषि व पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषद पुणे) यांनी दिली आहे.

यासाठी डॉ. अनिल परंडवाल (9921525453) व डॉ. दीपक राक्षे (9890990658) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!