ताज्या घडामोडी

स्वामित्व योजनेअंतर्गत गावठाणातील जमिनींचे ड्रोनद्वारे होणार सर्वेक्षण

आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते वराळे गावातून सर्वेक्षणाचा शुभारंभ

वराळे : स्वामित्व योजनेचा शुभारंभ मावळ तालुक्यात वराळे येथून आज करण्यात आला.या योजनेच्या माध्यमातून शासनाच्या विविध विभागांच्या वतीने प्रत्येक गावाच्या गावठाणातील मिळकतींचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून गावठाण क्षेत्र हद्द निश्चिती, नकाशे, मिळकत पत्रिका तयार करण्यात येणार आहे.त्यामुळे प्रत्येक जागेचा/ मिळकतीचा नकाशा तयार होईल, सीमा निश्चित होतील व मिळकतींचे नेमके क्षेत्र माहित होईल. गावठाणातील प्रत्येक मिळकतीच्या मालकी हक्काचे अभिलेख मालमत्ता पत्रक (प्रॉपर्टी कार्ड) तयार होणार आहे.

तसेच गावठाणातील रस्ते, समाजमंदिरे, नाले इत्यादींच्या सीमा देखील निश्चित होतील, त्यामुळे विकासकामे करण्यास सुलभता येईल.या योजनेबाबत ग्रामस्थांना असणाऱ्या शंकांचे निरसन संबंधित विभागाचे अधिकारी करणार आहेत.भविष्याचा विचार करून स्वामित्व योजनेच्या दूरदर्शी उपक्रमास सर्व ग्रामस्थ,स्थानिक लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे,असे आवाहन करतो.

यावेळी आमदार सुनिल आण्णा शेळके, उपअधीक्षक भूमी अभिलेख सौ.उर्मिला गलांडे, तहसीलदार श्री.मधुसूदन बर्गे, नायब तहसीलदार श्री.रावसाहेब चाटे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष श्री.बबनराव भेगडे, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष श्री.सुभाष जाधव, जिल्हा परिषद सदस्य श्री.बाबुराव वायकर, राष्ट्रवादी काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष, नगरसेवक श्री.गणेश खांडगे, जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री.विठ्ठलराव शिंदे, कार्याध्यक्ष श्री.दिपक हुलावळे, पंचायत समिती सदस्य श्री.साहेबराव कारके, नगरसेवक श्री.सुनिल ढोरे, संजय गांधी समिती अध्यक्ष श्री. नारायणराव ठाकर, युवक अध्यक्ष श्री.कैलास गायकवाड, श्री.सुनिल दाभाडे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष सौ.सुवर्णाताई राऊत, देहू नगराध्यक्षा सौ.स्मिताताई चव्हाण, वराळे ग्रामपंचायत सरपंच सौ.मनीषा शिंदे, आदी मान्यवर तसेच आजी-माजी सदस्य, पदाधिकारी, ग्रामस्थ, पत्रकार बंधु-भगिनी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!