ताज्या घडामोडी

लोणावळ्यात दोन दिवसीय बँको सहकार परिषदेचे आयोजन

मान्यवरांच्या हस्ते आज परिषदेचे उद्घाटन

लोणावळा : अविज पब्लिकेशन व गॅलेक्सी इनमा यांच्या संयुक्त विद्यमाने सहकारी पतसंस्थांसाठी दोन दिवसीय बँको सहकार परिषदेचे आयोजन लोणावळा येथे 13 मार्च 15 मार्चपर्यंत करण्यात आले आहे.या परिषदेचा उद्घाटन सोहळा आज दुपारी तीन वाजता हॉटेल लगूना रिसॉर्ट येथे पार पडला.

या उद्घाटन प्रसंगी बोलताना रिझर्व बँकेचे निवृत्त अधिकारी व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अविनाश जोशी म्हणाले,पतसंस्थांनी सभासदांच्या व ठेवीदारांच्या हितासाठी काम करावे. तंत्रज्ञांना शिवाय बँकिंग येत्या काळात अशक्‍य आहे. त्यामुळे ग्राहकांना सेवा देण्यासाठी तंत्रज्ञान आत्मसात करावे. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते शशांक पत्की यांनी ‘टीडीएस कपात व भरणा’ या विषयावर व्याख्यान दिले.

या परिषदेअंतर्गत सहकारी पतसंस्थांसाठी राज्यस्तरीय प्रशिक्षणाचा कार्यक्रम राबविला जाणार आहे. सहकार क्षेत्राला बळकटी देणाऱ्या सहकारी पतसंस्थांना तसेच त्यांच्या कार्यास प्रोत्साहन मिळावे या हेतूने बँको   सहकार परिषद व बँको पतसंस्था दरवर्षी ब्लू रिबन कार्यक्रम आयोजित करत असते.कार्यक्रमाचे हे नववे वर्ष आहे.कार्यक्रमाला अठरा जिल्ह्यातील पतसंस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या कार्यक्रमाअंतर्गत विभागवार पतसंस्थांची माहिती एकत्रित करून त्यानुसार विभागातील पुरस्कार दिले जाणार आहेत.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निनाद काळे यांनी तर प्रास्ताविक अविनाश शिंत्रे गुंडाळ यांनी केले. तर आभार अशोक नाईक यांनी मानले.

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!