ताज्या घडामोडी

एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने देहदान जनजागृती अभियान

तळेगाव :  एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीररचनाशास्त्र विभागातर्फे देहदान जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे.या अभियानाचा एक भाग म्हणून काल (दि. 14 मार्च) रोजी या विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांतर्फे यशवंतनगर भागातील वानप्रस्थाश्रम येथे कार्यक्रम घेण्यात आला.

देहदान म्हणजे वैद्यकीय क्षेत्राच्या प्रगतीकरिता मृत्यूनंतर केलेले अचेतन शरीराचे दान सध्या प्रचलित असणाऱ्या सर्व शस्त्रक्रिया या प्रथम मृत मानवी शरीरावर केल्यावरच प्रचलित झालेल्या आहेत. वैद्यकीय क्षेत्रात निरंतर प्रगती करता मृत मानवी देहाची उपलब्धता अत्यंत आवश्यक आहेत. त्यामुळेच देहदान हे सर्वश्रेष्ठ दान समजले जाते.याप्रसंगी डॉ.सोनाली खके यांनी देहदान संबंधीची संपूर्ण माहिती उपस्थितांना दिली. तसेच देहदानाची प्रक्रिया व त्या संबंधीच्या सर्व शंकांचे निरसन केले.

या कार्यक्रमाचे संयोजन डॉ. विवेक निर्मळे यांनी केले. शरीररचनाशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. शशांक वेदपाठक यांनी वानप्रस्थाश्रमच्या सेक्रेटरी श्रीमती उर्मिला छाजेड यांचे आभार मानले. याप्रसंगी सुषमा चव्हाण डॉ. अश्विनी भेले प्रयोगशाळा तंत्रज्ञ संदीप खालकर व शरीररचनाशास्त्र विभागातील इतर शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमास महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. सुचित्रा नागरे व प्राचार्य डॉ. स्वाती बेलसरे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!