ताज्या घडामोडी

एज्युकेशन तंत्रच्या मासिकात मावळ तालुक्यातील मनिषा सोनवणे यांच्या लेखाची निवड

मावळ : तालुक्यातील परंदवडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका मनिषा सोनवणे यांनी कोरोनाकाळात केलेल्या अध्यापना विषयीच्या ‘शाळा बंद-शिक्षण सुरु’ या लेखाची राज्यस्तरावर प्रसिद्ध असणाऱ्या एज्युकेशन तंत्र या मासिकात निवड झाली.नुकताच या मासिकाचा मार्च २०२२ चा अंक प्रसिद्ध झाला.

मनिषा सोनवणे या उपक्रमशील शिक्षिका असून नुकताच त्यांना ‘पुणे जिल्हा परिषदेचा गुणवंत शिक्षिका पुरस्कार’ प्राप्त झालेला आहे.कोरोनाकाळात शिक्षणात खंड पडू नये म्हणून त्यांनी व्हॉट्सअँपचे ग्रुप बनवून अॉनलाईन टेस्ट पाठवणे,झूम मिटींगच्या साहाय्याने मार्गदर्शन करणे,स्वतः शैक्षणिक व्हिडीओ तयार करुन यू ट्यूबवर अपलोड करणे,वेळोवेळी पालक भेटी घेणे या माध्यमातून अध्यापन सुरु ठेवले.स्वाध्याय उपक्रम,शिकू आनंदे,किशोर गोष्टी यामध्ये विद्यार्थी सहभाग घेऊन त्यांच्या मनात शिक्षणाविषयी आवड निर्माण केली.त्यांना कोविड काळात आलेल्या अडचणींवर मात करत विद्यार्थी विकास कसा साधला याचा सदरच्या लेखात समावेश आहे.कोरोनाकाळात पालकांची उदासिनता,आर्थिक दुर्बलता,अचानक शिक्षणात आलेला तंत्रज्ञानाचा वापर या बाबींमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या पण प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न व ध्येय गाठण्यासाठी आवश्यक असलेल्या कष्टाची तयारी दाखवल्याने मी विद्यार्थी विकासात खंड पडू दिला नाही,असे मत मनिषा सोनवणे यांनी व्यक्त केले.

मावळ तालुक्यात कार्यरत असणाऱ्या महिला शिक्षिकेचा लेख एज्युकेशन तंत्रच्या मासिकात आल्याने मावळ तालुक्यातील शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!