पवनानगर : पवनमावळ मधील श्री संत तुकाराम महाराज सामाजिक ट्रस्ट तसेच वारकरी संप्रदायाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे तुकाराम बीज निमित्ताने पालखीचे प्रस्थान कॉलनीमधील गणपती मंदिरातून देहू कडे झाले.
यावेळी मृदुंगाच्या गजरात व अखंड हरिनामात परिसर न्हाऊन निघाला होता. परिसरातील तरुण, वयोवृद्ध मंडळी या पायी दिंडी पालखीत मोठ्या संख्येने सहभागी झाली होती.गेली अकरा वर्षे हा पायी वारी सोहळा नियमाने सुरू आहे.