ताज्या घडामोडी

तिकोना पेठ येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

पवनानगर : पवनानगर हद्दीतील तिकोनापेठ येथील एका 22 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी( दि. 18) रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.

गुरुदास भाऊ मोहोळ (वय 22,  तिकोनापेठ पवनानगर )असे या युवकाचे नाव आहे.

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत गुरुदास मोहळ याने आईचे आजारपण व गरिबीच्या नैराश्यातून त्याच्या राहत्या घराच्या पाठीमागे वनक्षेत्राच्या हद्दीत असलेल्या एका झाडाच्या फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार विजय गाले घटनास्थळी पोहोचले व ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेहाचा पंचनामा केला. पुढील तपास पोलीस हवालदार विजय गाले करीत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!