ताज्या घडामोडी

महागाईचा कहर ; पेट्रोल-डिझेलच्या भावात पुन्हा वाढ

पुणे : देशात महागाईचा कहर झाला असून पेट्रोल व डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. इंधनाचे दर आज पुन्हा एकदा वाढले आहेत. त्यामुळे पुणे शहरात पेट्रोल 112 रुपये डिझेल 94. 80 रुपये प्रति लीटर झाले आहे. ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अली दारूवाला यांनी ही माहिती दिली.

पुणे शहरात 23 मार्च रोजी पेट्रोल 111.19 रुपये प्रतिलिटर होते.तर डिझेल 93.97 रुपये प्रतिलिटर होते. यामध्ये वाढ होऊन शुक्रवारी (दि. 25) शहरात पेट्रोलचे दर 112 रुपये प्रति लिटर तर डिझेल 94.80 रुपये प्रति लिटर झाले आहे.सलग तिस-यांदा शहरात पेट्रोल-डिझेलची दरवाढ झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत 118. 87 डॉलर प्रति बॅरल झाली आहे.परंतु पाच राज्यातील विधानसभा निवडणुका सुरू असताना कच्च्या तेलाचे भाव आकाशाला भिडलेले असतानाही पेट्रोल डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले. निवडणुका संपताच दरात वाढ करण्यात आली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!