ताज्या घडामोडी

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वाहतुकीसाठी खुला

लोणावळा : मुंबई पुणे द्रूतगतीमार्गावर खंडाळा घाटात रासायनिक द्रव्य भरलेला टँकर उलटून वाहतुक कोंडी झाली. आय आर बी कंपनी , देवदूत , तसेच वहातूक पोलिसांकडून रासायनिक द्रव्य बाजूला काढण्याचे काम सुरू असून खंडाळातील वाहतूक जुन्या महामार्गावर वळविल्याने वाहनांच्या वलवण पर्यत रांगा लागून कोंडी वाहतूक झाली होती. आज सकाळी आठ चे दरम्यान टँकर उलटला होता.त्याचेमधील साबण बनविण्यासाठी लागणारे रासायनिक द्रव्य रस्त्यावर सांडून वाहने सरकत होती.हवेच्या संपर्कात आलेल्या रासायनिक द्रव्याचे मेणासारखे थर जाड झाल्यावर वाहने घसरू लागले असल्याने वाहतूक पोलिस , देवदूत , तसेच स्वच्छता कर्मचारी येथे आय आर बीचे मदतीला धावले .दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास वाहतुकीसाठी रस्ता खुला करण्यात आला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!