ताज्या घडामोडी

भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर नॕशनल एक्सलन्स अॕवार्डने धिरूभाई कल्याणजी सन्मानित

लोणावळा : भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर नॕशनल एक्सेलेन्स अॕवार्डने धिरूभाई कल्याणजी यांना सन्मानित करण्यात आले. नवी दिल्लीत लोणावळ्याचे माजीउपनगराध्यक्ष व एक जेष्ठ सामाजसेवक डाॕ.धिरूभाई टेलर यांना समाजसेवेत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले.

नॕशनल युथ आॕवार्डीस फौडेशन आॕल इंडिया , डाॕ.विशाखा सोशल फौडेशन , आणि अन्य चार संस्थांच्या साहयोगाने हा दिमाखदार सोहळा नवी दिल्लीच्या महाराष्ट्र सदन च्या प्रेस हाॕलमधे संपन्न झाला. आंतरराष्ट्रीय महिलादिनाचे निमित्ताने देशातील विविध क्षेत्रातील ५५ व्यक्तींना भारतरत्न डाॕ. बी.आर.आंबेडकर एक्सेलेन्स अॕवार्डने सन्मानित करण्यात आले.यामध्ये महाराष्ट्रातील दहा पुरूष व सात महिला पुरस्कार विजेते यांचा समावेश आहे.

पुरस्कार वितरण सोहळा केंद्रीय सामाजिक न्याय व वित्त राज्यमंञी डाॕ.भागवत कराड , मागास व भटके विमुक्त आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष भिकू( दादा ) रामजी इधाते , राष्ट्रीय मानव अधिकार आयोग सदय्य डाॕ.ज्ञानेश्वर म.मुळे , महिला आयोग अध्यक्षा डाॕ.अंजना पवार ,दिल्लीच्या आल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्षा नॕन्सी बार्लो , डाॕ.विशाखा सोशल फौडेशन अध्यक्ष डाॕ.मनिष गवई , आणि विश्वस्थ तसेच संस्था प्रतिनिधी उपस्थित होते.

डाॕ.धिरूभाई प्रभुभाई टेलर (कल्याणजी ) यांनी वयाचे १५ वर्षापासून धार्मिक कार्यात नवराञौत्सवाच्या व गणेशोत्सव या कार्यक्रमात सहभागी होऊन कार्य सुरू केले.तर वयाचे २४ वर्षापासून सामाजिक कार्य व लोकउपयोगी सेवा कार्यात स्वतः ला झोकून दिले.. ते ७९ व्या वर्षीही समाजातील गरीब कुटूंबातील मुली व मुले यांचे शिक्षणासाठी विशेष परिश्रम घेत आहेत. नगरपरिषद शाळेतील मुलींना शिक्षण आर्धवट सोडावे लाग् नयेत म्हणून खूप प्रयत्न केलेले आहेत. करत आहेत आणि करणार आहेत. समाजातील तळागाळातील मुलींच्या , मुले व महिलांच्या शिक्षणासाठी भरीव कार्य करण्याचा त्यांचा मानस आहे असे डाॕ.धिरूभाई कल्याणजी यांनी सांगितले .

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!