ताज्या घडामोडी

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी वेषांतर करत आवळल्या आरोपीच्या मुसक्या

चिंचवड : आयुक्तांशी ओळख  असल्याची बतावणी करणा-यास पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी स्वतः कारवाईत सहभागी होत वेषांतर करून दोन महिलांसह तिघांना अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 26 रोजी) रात्री नऊ ते साडे नऊच्या दरम्यान करण्यात आली.

रोशन संतोष बागुल (वय 22 )गायत्री रोशन बागुल (वय 22 रा. देव इंद्रायणी सोसायटी देहूगाव, मुळगाव दिंडोरी नाशिक )आणि पूजा विलास माने (वय 22 रा. देव इंद्रायणी सोसायटी देहूगाव, मुळगाव हडपसर, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत .तर ज्ञानेश्वर (पूर्ण नाव माहिती नाही )आणि अजित हाके( रा. त्रिवेणीनगर) हे दोघे फरार आहेत.

विन्सेंट अलेक्झांडर जोसेफ ( वय 52 रा.मोरेवस्ती चिखली) यांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हे विन्सेंट जोसेफ यांच्या खोलीत भाड्याने राहात होते.आरोपी रोशन याने तो सायबर क्राईमचा माणूस असल्याचे सांगितले.तसेच त्याने महाराष्ट्र पोलीस हेल्पर असे बनावट ओळखपत्र तयार केले होते.आरोपीने फिर्यादी यांना विश्वासात घेत आम्ही जमिनीची प्रकरणे सोडवतो. पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश आणि मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या सोबत ओळख असल्याची बतावणी केली. फिर्यादी यांच्या जमिनीचा मॅटर सोडवतो परंतु त्यासाठी पैसे द्यावे लागतील असे सांगितले.याबाबत फिर्याद यांनी पोलिसात धाव घेतली.

पोलीस आयुक्तांनी वेषांतर करत स्वतः कारवाईत सहभागी होत पोलिसांची टीम तयार केली. आरोपी पैसे घेण्यासाठी पुनागेट,भक्ती शक्ती चौक येथे आले असता पैसे स्वीकारल्यानंतर आयुक्तांनी आरोपीला पकडले. दोन महिला आरोपींना देखील अटक करण्यात आली. तर दोन आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!