ताज्या घडामोडी

वडगाव फाटा येथे वाहतूक पोलिसांकडून वाहन चालकांची लूटमार

मावळ : मावळ तालुक्यात मुंबई-पुणे महामार्गावर वडगाव – चाकण चौक अर्थात वडगाव फाटा येथे वाहतूक पोलिसांकडून वाहन चालकांची खुलेआम लुटमार सुरू आहे. तळेगाव चाकण राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत बंदी असून दुपारी 2 ते 4 या वेळेत केवळ स्थानिक अवजड वाहनांना प्रवेश देण्याचा आदेश असताना वडगाव फाट्यावरील वाहतूक पोलिस वाहन चालकांकडून राजरोसपणे पैसे घेऊन वाहने सोडतात.

दुपारी 2 ते 4 असलेली सूट फलकावर नमूद न करता जुनेच फलक दाखवत अक्षरशा लूट चालू आहे. आज दुपारी सव्वा बाराच्या सुमाराला OD-04-M6701  या क्रमांकाच्या वाहनाचा चालक व क्लिनरला शिवीगाळ व मारहाण करत नो एन्ट्री प्रवेश केल्याचा दंड 22 हजार असून 15 हजारांची मागणी करत अडीच हजारांवर तडजोड केल्याची घटना वाहन चालक व क्लिनर ने सांगितली.

जितेन्द्र कुमार रजक (रा. बिहार) यांनी याबाबत तळेगाव स्टेशन चौकात वाहतूक पोलिसांकडे तक्रार केली.अशाच प्रकारे आणखी एका ड्रायव्हरने एंट्री फ्री घेऊनच आमची सुटका होते अशी तक्रार आवाज न्युज प्रतिनिधीकडे केली.

अर्धा ते पाऊण तासाच्या कालावधीत अशी जवळपास वीस वाहने सोडण्यात आली होती. अशा प्रकारे प्रत्येक वाहनाकडून एन्ट्री फी घेत रोजचे हजारो रुपये तर महिन्याला लाखो रुपयांची लूट केली जात आहे. वडगाव फाटा चौक केवळ पैसे गोळा करण्याचा अड्डा बनला आहे? याची कल्पना वरिष्ठांना आहे का? की ते जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहेत ?की त्यांनी दिलेले टार्गेट पूर्ण करण्यासाठी वाहनचालकांना शिवीगाळ व मारहाण केली जात आहे? तथाकथित नो एंट्री नागरिकांच्या सोयीसाठी आहे की पोलिसांच्या कमाईसाठी ?वर्षानुवर्ष सुरू असलेला हा गोरखधंदा कधी बंद होणार? असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात असून त्याची उत्तरे वरिष्ठांकडून मिळणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!