ताज्या घडामोडी

टोलवसुलीसाठी येणार नवीन प्रणाली ; फास्टॅग वरून टोलवसुली बंद होणार

आवाज न्युज : संसदीय समितीने टोल कर वसूल करण्यासाठी लावलेले लाखो वाहनांचे फास्टॅग काढून टाकण्याची शिफारस केली आहे. लवकरच जीपीएस द्वारे बँक खात्यातून टोल वसूल केला जाणार आहे. या सूचनेची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे.

या शिफारसीनुसार केंद्र सरकार टोल वसुलीसाठी जीपीएस आधारित प्रणाली कार्यान्वित करणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. जीपीएस प्रणालीद्वारे देशभरातील टोल प्लाझा वरील कोट्यावधी प्रवाशांची सुटका होईल. ट्रॅफिक जाम मध्ये न फसल्यामुळे इंधनाची बचत होईल.

समितीने शिफारस केली आहे की,  जीपीएस आधारित टोल टॅक्स वसुलीची रचना अशा प्रकारे करावी की टोलचे पैसे थेट प्रवाशाच्या बँक खात्यातून कापले जातील. यामुळे वाहनांवरील फास्टॅगची गरज संपुष्टात येणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!