ताज्या घडामोडी

युवा पिढीने समाजसेवा अंगिकारावी – सिनेअभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी

चिंचवड : लायन्स क्लब ऑफ तळेगावचा सुवर्ण महोत्सवी वर्षपूर्ती सोहळा तळेगाव येथील लायन्स विवेकानंद सभागृहाच्या प्रांगणात संपन्न झाला. याप्रसंगी शालेय मुले, लायन्स क्लबचे पदाधिकारी सदस्य, ग्रामस्थाच्या उपस्थितीत भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. यावेळी सिनेअभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी आमदार सुनिल शेळके, लायन्स क्लबचे ऑफ तळेगावचे अध्यक्ष ला. दीपक बाळसराफ, सचिव राजेंद्र झोरे, प्रान्तपाल ला. हेमंत नाईक, उपप्रान्तपाल, ला. सुनिल चेकर, माजी आंतरराष्ट्रीय संचालक ला. नरेंद्र भंडारी, माजी प्रांतपाल डॉ. दिपक शहा, दीपस्तंभ फाऊंडेशनचे संचालक युजवेंद्र महाजन, शशिकला शहा, प्रतिभा शिक्षण संकुलाच्या अध्यक्षा प्रतिभा शहा, तेजल शहा आदी उपस्थित होते. यावेळी क्लबचे माजी प्रांतपाल डॉ. दिपक शहा यांनी सामाजिक, अनाथ, दिव्यांग, रुग्णसेवा, शाळा आदी क्षेत्रातील संस्थांना 1 कोटी 25 लाख रुपये तसेच, क्लबचे पदाधिकारींनी देणगी स्वरुपात, धनादेश, स्मृतीचिन्ह स्वरुपात सन्मानपूर्वक देण्यात आले. त्यात दीपस्तंभ फाऊंडेशन, कलाषम, वानप्रस्थ आश्रम, वात्सल्य आश्रम, किनारा वृद्धाश्रम, सेवाधाम संस्था, शृतभवन, उद्योगधाम संस्था, स्माईल व्यसन मुक्ति केंद्र, कलापिनी आदींचा समावेश होता. या कार्यक्रमात डॉ. दीपक शहा यांनी मोठ्या प्रमाणावर देणगी दिल्याबद्दल, सेवा कार्याची एक मिसाल कायम केल्या प्रित्यर्थ त्यांना मावळचे आमदार सुनिल शेळके व सिनेतारका मृणाल देव-कुलकर्णी यांच्या हस्ते स्मृती चिन्ह, मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले.

सिनेतारका मृणाल देव-कुलकर्णी पुढे म्हणाल्या, संस्कार घडत असतो तो प्रत्येक पिढीत घडत आलेली आहे. आजची वर्तमान परिस्थिती पाहता प्रत्येकाने येणार्‍या पुढच्या पिढीला काय संस्कार देणार आहे. यांचा जाणीवपूर्वक विचार केला पाहिजे. तसेच, पालकांनी आपल्या मुलाबरोबर संवाद करा, त्याच्याकडूनही शिकण्यासाठी बरेच काही असते ते पालकांनी आत्मसात करण्याची आवश्यकता आहे. याच तळेगावात माझा जन्म झाला. म्हणूनच मी तळेगावचीच आहे हे आज अभिमानाने सांगते. पंचक्रोशीतील विविध संस्थांचा गुणगौरव व केलेली भरीव आर्थिक मदत मी रंगमंचावर पाहिली असता डॉ. दिपक शहा सरांच्या आई पाहिले त्यांनी आपल्या मुलाला नेहमी सल्ला देत मदत करायचीच तर, चांगल्याप्रकारे कर तसेच, त्यांच्या मुलीही म्हणाल्या आम्हाला आई-वडीलांकडून कसल्याच अपेक्षा नाही. तुम्ही मिळविलेली संपत्ती तुम्हाला जे जे योग्य वाटेल ते करावे, हे दुर्मिळचित्र आज मला पहायला मिळाले. तळेगाव लायन्स क्लब सतत 50 वर्षे कार्यरत आहे. समाजातील उपेक्षितांना मदत करते हे पाहता आज मला या रंगमंचाने विचार करायला भाग पाडले. प्रत्येकाने आपल्या आयुष्याचा जमाखर्च काय असणार यांचा विचार करावा, असे आवाहन करून डॉ. दिपक शहा व त्याच्या परिवारांचा मुक्तकंठाने कौतुक केले.

आमदार सुनिल शेळके म्हणाले, लायन्स क्लब ऑफ तळेगाव ही संस्था गेली 50 वर्षे सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करते आहे. संस्थेने मावळातील अनेक गरजू संस्थांना मदत केली. दीनदुबळे, दिव्यांगांना मदत मिळाली पाहिजे. त्याबाबत शासनाने देखील आत्मपरिक्षण करण्याची आवश्यकता आहे. आम्ही कोठे कमी पडलो का? याचा विचार करून अनाथांना साथ दिली पाहिजे. डॉ. दिपक शहा व त्यांचे सहकारी मावळातील तसेच, इतर ठिकाणी प्रत्यक्ष कृतीरुपी गेली अनेक वर्षे मदत करीत आहे. पिण्याचे पाणी, शालेय मुलांसाठी खोल्या, रुग्णांची नेत्रचिकित्सा आदी आदी कामे सामाजिक जाणीनेतून समाजाचे देणे याच भावनेने करीत आहात. मी सुद्धा मावळातील जिल्हा परिषदाच्या शाळांसाठी एक कोटी रुपये देण्याचे आश्वासन देतो. त्याचा खर्च कसा करायचा हे लायन्स क्लब ऑफ तळेगावच्या सर्व पदाधिकार्‍यांनीच ठरवावा. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाच्या अडीअडचणी जाणवल्यास त्या सोडविण्यासाठी मी आपल्या मागे खंबीरपणे उभा आहे. असे सांगून आम्ही राजकरणी मंडळी खुर्चीसाठी व ओढण्यासाठी प्रयत्न करतो. माझ्या मते खुर्चीपेक्षा आपल्या संस्थेप्रमाणे समाजाकरिता पळाले पाहिजे, असे भावनिक आवाहन केले.

प्रास्ताविकात डॉ. दिपक शहा म्हणाले, मला 1986 सालापासूनच वसंत भावे याचे मार्गदर्शक मिळाले. गेल्या 50 वर्षात केलेली कार्याची माहिती देत ला. दिपक बाळसराफ, ला. प्रमिला वाळुंज, ला. राजश्री शहा आदी सहकार्‍यांनी कार्य केले. वर्षभरात 550 हून जास्त कौतुक करून लोकांची साथ व सहकार्यामुळेच कार्य करू शकलो. तळेगावच्या जनतेचे आभार मानून त्याचे आशिर्वाद सहकार्य व पाठींब्याची अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी लायन्स क्लब ऑफ तळेगावचे अध्यक्ष ला. दीपक बाळसराफ, दीपस्तंभ फाऊंडेशनचे संचालक युजवेंद्र महाजन, माजी आंतरराष्ट्रीय संचालक ला. नरेंद्र भंडारी, प्रान्तपाल हेमंत नाईक, उपप्रांतपाल ला. सुनिल चेकर, पुण्याचे माजी उपमहापौर डॉ. सतीश देसाई आदींनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रकल्प प्रमुख प्रकाश ओसवाल सदस्य ला. संदीप काकडे, मनोहर दाभाडे, ला. दिलीप शहा, ला. प्रशांत शहा, ला. सुरेश जाधव, ला. नंदकुमार काळोखे, ला. सचिन शहा, ला. केतन ओसवाल, ला. वाय.जी. पाटील, लिओ क्लबचे शुभम वाळुंज, लिओ सहील जैन, सेजल, कांती आदींनी संयोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश ओसवाल व दिनेश कुलकर्णी यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!