ताज्या घडामोडी

महाराष्ट्रातील संत विचारांचा ठेवा – लेखक विठ्ठल दळवी

आवाज न्यूज : ध्याचा व पुरोगामी विचारवंताचा महाराष्ट्र,हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रक्षक छत्रपती शिवरायांच्या व छत्रपती शाहू महाराज, थोर संतांच्या, महात्मा फुले, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर, थोर विचारवंत व समाजसुधारकांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये.अनेक आंदोलने उभारुन चळवळी करुन अनेक संकटांचा सामना करुन थोर समाजसुधारकांनी व पत्रकारांनी आपल्या सुदंर लेखणीतून, विचारांतून सत्यात उतरविलेला म्हणजे पुरोगामी विचारवंतांचा महाराष्ट्र.

स्वातंत्र्यापासून काही दिवसातच महाराष्ट्राने अनेक लढे देऊन अनेक संकटे पाहून मार्मिक अशी विचारधारा ठेऊन १०६ हुतात्म्यांनी आपल्या देहाचे बलिदान करुन दि. ०१ जून १९६० रोजी साकार केलेला सोनेरी अक्षरांनी लिहावा असा संयुक्त पुरोगामी महाराष्ट्रवैभवशाली परंपरा लाभलेल्या व जगात सर्वश्रेष्ठ असणा-या हिंदू धर्म संस्कृती व नैसर्गिक साधन संपत्तीने स्वयंपूर्ण अशा थोर संतांच्या ग्रंथांच्या व विचारवंतांच्या महाराष्ट्रामध्ये मानव किती विचारांपासून, ग्रंथांपासून प्राचीन संस्कृतीपासून दूर गेला आहे याची प्रचिती येते. यातच मराठी भाषेची घेतलेली इंग्रजी भाषेन जागा झपाट्याने परकीय संस्कृती डोकावत असताना अदृश्यरुपी महाभयंकर कोरोणाने केलेला शिरकाव, जंगलामध्ये वन्यजीवांच्या जीवनात मानवाने केलेले अतिक्रमण त्यामुळे वन्य जीव सृष्टीसाठी न मिळणारी जागा तसेच पर्यावरणाचा सुरु असलेला –हास कसा काय मानव सुखानं खाईल घास यातूनच पृथ्वीवर मानवाची झालेली वाताहत पाहता मानवाला यातून आपूले जीवनच सावरणे कठीण झाले आहे.

अशा विचारवंतांच्या समाजसुधारकांच्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेची सुरु असलेली गळचेपी का गेला आहे मराठी माणूस झोपी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज व विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र भूमीमध्ये संतविचारांची, ग्रंथांची, मराठी भाषेची, सामाजिक, शैक्षणिक व भौगोलिक क्षेत्राची झालेली अवस्था आतातरी प्रत्येकानं ठेऊया संतविचारांची व पुरोगामी विचारांविषयी आस्था तेव्हाच प्रत्येकाची सुंदर होईल अवस्था.

पुरोगामी महाराष्ट्रातील विचारांची परंपरा याच महाराष्ट्रासाठी दिलेला लढा मराठी भाषेची घसरण परकीय संस्कृतीचे आक्रमण पुरोगामी विचारांचे ग्रंथांचे संस्कृतीचे विस्मरण. म्हणूनच सर्वांचेच कारण पाहता मानव गेला आहे सध्याच्या सुंदर सृष्टीमध्ये शरण. याचे कुणालाच होऊ नये विस्मरण. यासाठी पुरोगामी विचारांची संतांच्या ग्रंथांची ठेऊया आठवण, आतातरी संतविचारांचा पुरोगामी विचारांचा ठेऊया मान राहिलेली दिवस जातील सुखानं..

लेखक विठ्ठल दळवी

महाराष्ट्र राज्य लोकसेवा कवी भूषण कविवर्य

शाळा दारुंब्रे, गाव कोथुर्णे सोमाटणे, ता, मावळ पुणे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!