ताज्या घडामोडी

प्राध्यापिका संजीवनी पांडे यांना व्यवस्थापन शास्त्रातील डॉक्टरेट पदवी प्रदान

चिंचवड : कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य शाखेतील प्राध्यापिका संजीवनी पांडे यांना नुकतीच टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची व्यवस्थापन शास्त्रातील पीएचडी ही पदवी मिळाली.

ग्लोबल वार्मिंग च्या भविष्यातील भयानक परिणामांना ओळखून मनुष्याच्या मूलभूत गरजा भागवताना, निवारा हेच मोठे कारण पर्यावरण ऱ्हासाला जबाबदार बनत आहे. ह्या वर उपाय म्हणून eco – friendly houses ह्या पर्यायातून builders & byuers चा आढावा घेणारा शोध निबंध ” STUDY OF FACTORS AFFECTING BUYING BEHAVIOR OF ECO-FRIENDLY HOUSES” सादर केला .डॉ मुकुंद डोंगरे ह्यांचे त्यांना गाइड म्हणुन मार्गदर्शन लाभले.

डॉ.संजीवनी पांडे यांना डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल प्रतिभा महाविद्यालयाकडून संस्थेचे सचिव डॉ दीपक शहा ,प्राचार्य डॉ बाबासाहेब सांगळे,कनिष्ठ महाविद्यालयाच्या डॉ वनिता कुऱ्हाडे तसेच संस्थेचे सीईओ डॉ. राजेंद्र कांकरिया यांच्या उपस्थितीत डॉ संजीवनी पांडे यांना शुभेछ्या देऊन सत्कार करण्यात आला .यावेळी डॉ. पांडे यांनी प्रतिभा महाविद्यालायकडून वेळोवेळी मिळालेल्या सहयोगाबद्दल सर्वांचे आभार मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!