ताज्या घडामोडी

कार्ला परिसरात कलम 144 लागू ; एकवीरा देवी यात्रेसाठी प्रशासन सज्ज

तीनशे ते चारशे अधिकारी व पोलिस कर्मचारी चोख बंदोबस्तावर

लोणावळा : महाराष्ट्रातील कोळी , आगरी कोळी , आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे , मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कुलदैवत असलेल्या कार्लाच्या श्री एकविरा देवीची याञा तीन दिवस होणार आहे. कोरोनाच्या काळातील निर्बंध हटवले असल्याने यावर्षी मोठ्या उत्साहात ही चैञी याञा संपन्न होण्यासाठी विविध खात्याचे अधिकारी यांची गडावर बैठक पार पडली.

सुमारे तीनशे ते चारशे अधिकारी व पोलिस कर्मचारी चोख बंदोबस्तावर राहणार असून पशुहत्या बंदी , दारूबंदी , फटाके आणि डी.जे लावून सार्वजनिक शांतताभंग करणाऱ्यांवर पोलिस कडक पावले उचलणार आहे . गड परिसरात १४४ कलम लागू केले असल्याचे , तहसिलदार श्री.मधुसुदन बर्गे यांनी सांगितले .

पुणे जिल्हाचे जिल्हाधिकारी ,मावळचे प्रांताधिकारी यांचे आदेशानुसार मावळचे तहसिलदार मधुसुदन बर्गे यांनी आयोजित केलेल्या बैठकीला लोणावळ्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाटील , लोणावळा ग्रामिणचे पोलिसनिरिक्षक प्रविण मोरे , कार्लाचे मंडल अधिकारी माणिक साबळे , मळवलीच्या तलाठी मीरा बो-हाडे , वनअधिकारी प्रमोद रासकर , महावितरण अभियंता अक्षय पवार ,वेहेरगावचे पोलिस पाटील अनिल पडवळ आदि उपस्थित होते.

ता.७ रोजी सप्तमीला देवघर येथे देवीच्या माहेरघरची श्री काळभैरवनाथ व श्री जोगेश्वरी यांची पालखी मिरवणूक वाद्यांच्या गजरात संपन्न होईल. या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त राहील. ता.८ रोजी अष्ठमीला श्री एकविरा देवीच्या याञेचा मुख्य दिवस असून श्री एकविरा देवीच्या सोन्याच्या मुखवटा असलेल्या पालखीची गडावरच सुमारे दहा हजार भाविक भक्त , मानकरी , देवस्थानचे विश्वस्थ व गुरव पुजारी यांच्या उपस्थितीत होईल. लाखो कोळी बांधव ठाणे , मुंबई येथून दर्शनासाठी लहान मोठ्या पालख्या घेवून येतात. नवस केलेल्या लहान मुलांना घेवून नवस फेडायला कुटूंबातील सदस्य व मिञमंडळीला घेवून येतात. या याञेसाठी पोलिसांकडून ३०० पोलिस कर्मचारी व साठ अधिकारी , शीघ्र कृतिदलाचे जवानाची कंपनी , स्ट्रायकींग पथक यात चोख बंदोबस्त ठेवणार आहे. याञेसाठी नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात येणार असून पशुहत्या बंदी गडावर करण्यात आली आहे. अग्निशामक गाड्या राहतील.

जिल्हा आरोग्य विभागाचे कार्ला आरोग्य केंद्राचे पथक गडावर दोन ठिकाणी राहणार आहे. इंटरकाॕम सेवा , सीसीटीव्ही कॕमेरे , गडावर विजेचे दिवे , विद्युत पुरवठ्याच्या कामासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी , पिण्याच्या पाण्याची व्यवस्था , सुलभ शौचालयात पाण्याची व्यवस्था गडावर जाण्यासाठी पायऱ्यांची डागडुजी तसेच गडाखाली व गडाच्या मध्यावर वाहने पार्किंगची सोय करण्यात येणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!