ताज्या घडामोडी

वाढत्या महागाईच्या विरोधात लोणावळ्यात महाविकास आघाडीचे आंदोलन

लोणावळा : देशभरात वाढत चाललेल्या महागाईच्या विरोधात काल लोणावळा शहरात महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

देशभरात महागाई व बेरोजगारीचा आलेख वाढत चालला आहे. त्याविरोधात तसेच नेत्यांच्या व मंत्र्यांच्या घरावर ईडीच्या धाडी पडत आहेत या विरोधात हे आंदोलन करण्यात आले आहे.

याप्रसंगी शिवसेना मावळ तालुका प्रमुख राजेश खांडभोर, लोणावळा शहर प्रमुख बाळासाहेब फाटक, लोणावळा शहर काँग्रेस अध्यक्ष प्रमोद गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष जीवन गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव निखिल कवीश्वर, राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य बाळासाहेब पायगुडे, युवा सेना तालुका अधिकारी श्याम सुतार, लोणावळा राष्ट्रवादी महिला अध्यक्ष मंजुश्री वाघ, राजू बोराटी, रवी पोटफोडे, जितेंद्र कल्याणजी यांच्यासह काँग्रेस शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!