प्रतिभा आर्ट सर्कलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्तकलागुणांचा विकास करणार कमला शिक्षण संकुलाचे खजिनदार – डॉ. भूपाली शहा यांची घोषणा
चिंचवड : चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट, प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड कॉम्प्युटर स्टडीज, प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालय प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालय, प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजमधील विविध शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या कुलगुणांना जोपासत त्यांना कलेतील व्यवसायिकतेची जाणीव अचूक मिळावी, विविध मान्यवरांकडून मार्गदर्शन मिळावे. यासाठी विविध स्तरावरील स्पर्धांमध्ये संधी त्यांचे शालेय महाविद्यालयीन शिक्षण, पदवी अभ्यासक्रम करतानाच मिळावे. कला, नाट्य, नृत्य, संगीत आदी क्षेत्रात विशेष रुची असणार्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास होण्यासाठी संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा नेहमीच प्राध्यापक व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत आले आहेत. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच नुकतेच महाराष्ट्रातील मानाचा फिरोदीया करंडक नाट्यस्पर्धेत पदार्पणातच थेट पुढच्या वर्षाच्या उपांत्य फेरीत प्रवेशाचा मान महाविद्यालयाला मिळाला व सादर केलेल्या ‘स्पर्श’ एकांकीकांच्या अंतिम फेरीत पाच वैयक्तिक पारितोषिके देखील मिळविली. त्यांचा गुरगौरव समारंभ महाविद्यालयात संपन्न झाला. त्यावेळी ‘प्रतिभा आर्ट सर्कल’चे उद्घाटन, दीपप्रज्वलन करून कमला शिक्षण संकुलाचे खजिनदार डॉ. भूपाली शहा यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावरती प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम, संचालक डॉ. सचिन बोरगावे, मुख्य प्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, डॉ. वनिता कुर्हाडे, प्रतिभा आर्ट सर्कलच्या समन्वयिका डॉ. अपर्णा देशमुख एकांकिकेचे लेखक, दिग्दर्शक अभिजीत शेलार उपस्थित होते.
संस्थेच्या खजिनदार डॉ. भूपाली शहा पुढे म्हणाल्या, महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या नाट्य, नृत्य, संगीत आदी क्षेत्रात विशेष रुची असणार्या विद्यार्थ्यांना वेळीच मार्गदर्शन व संधी उपलब्ध निर्माण झाली तर, त्या भविष्यात त्यांच्या क्षेत्रात प्राविण्य मिळवून समाजात, रसिकामध्ये आपला वेगळा ठसा निर्माण करू शकतील. अशांना सर्व प्रकारची मदत विविध स्पर्धात संधी उपलब्ध करून देण्यासाठीच प्रतिभा आर्ट सर्कलची स्थापना करण्यात येत आहे. आज महाराष्ट्रातील मानाचा फिरोदीया करंडक नाट्य स्पर्धा 2022 मध्ये महाविद्यालयातील स्पर्श एकांकिकामध्ये अंतिम फेरीत पाच वैयक्तिक पारितोषिके मिळविले. अनुश्री देशमुख (अभिनय उत्तेजनार्थ), साक्षी सुर्वे (अभिनय उत्तेजनार्थ), आर्या कुलकर्णी (पाश्चात्य गायन प्रथम), अंश पोटफोडे, प्रथमेश पोटघन (अल्ट्रा व्हायोलेट प्रथम), यांचा भेट वस्तू देवून आज महाविद्यालयाच्या वतीने गौरव करण्यात आला. ही संस्थेच्या नावलौकीकात भर टाकत अभिमानास्पद बाब आहे, अशा शब्दात कौतुक केले.
मुख्य प्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया म्हणाले, विद्यार्थ्यांना खेळ, सांस्कृतिक क्षेत्रात विशेष रुची असल्यास अभ्यासावर परिणाम होतो. पालकांची तक्रार असते. मी सुध्दा माझ्या शालेय व महाविद्यालयीन जीवनात नाट्य क्षेत्रात अनेक नाटकांत विविध भूमिका केल्या आज मी, अनेक पदव्या घेतल्या माझ्या शिक्षण क्षेत्रात कोणतीही अडचण आली नाही. योग्य नियोजन असेल तर काही परिणाम होत नाही, असा त्यांचा अनुभव उपस्थितांना सांगितला.
प्रतिभा आर्ट सर्कल उद्घाटन समारंभाच्या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर ‘स्पर्श’ एकांकीकातील काही प्रसंगाचे सादरीकरण करण्यात आले. प्रास्ताविकात समन्वयिका डॉ. अपर्णा देशमुख यांनी संस्थेतील मान्यवरांचे आभार व्यक्त करून आर्ट सर्कल माध्यमातून येणार्या पाच वर्षातील विविध कार्यक्रमाबाबत माहिती विशद केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गीता कांबळे यांनी तर आभार प्रा. तुलिका चटर्जी यांनी मानले.