ताज्या घडामोडी
हनुमान उत्सव समितीच्या अध्यक्षपदी चेतन पवार
तळेगाव : तळेगाव स्टेशन भागातील हनुमान समितीच्या अध्यक्षपदी डॉ. चेतन उमाकांत पवार यांची निवड झाली आहे. ग्रामस्थांनी घेतलेल्या बैठकीत ही निवड बिनविरोध करण्यात आली.
यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे, माजी नगराध्यक्ष कृष्णा कारके, माजी नगरसेवक सुदर्शन खांडगे, माजी अध्यक्ष केशव कुल, गणेश पवार, सचिन भांडवलकर, नरेश आगरवाल, अशोक पवार, अॅड. नितीन पवार, बाळासाहेब बो-हाडे आदी उपस्थित होते.