ताज्या घडामोडी

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी सतिश भेगडे यांची फेरनिवड

शेलारवाडी : मावळ येथील सतिश भेगडे यांची नुकतीच मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीसपदी फेरनिवड झाली.मावळ विधानसभेचे आमदार सुनिल शेळके,जेष्ठ नेते श्री.बबनराव भेगडे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या हस्ते तसेच पुणे जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकूले,देहुरोड शहराध्यक्ष प्रविण झेंडे यांच्या उपस्थितीत हे नियुक्तीपत्र देण्यात आले.

सतिश भेगडे हे उत्तम सुत्रसंचालक असून त्यांचा स्वभाव मनमिळावू असल्याने युवकांमध्ये ते लोकप्रिय आहेत.त्यांनी यापूर्वी देहूरोड शहर युवा उपाध्यक्ष, तालुका प्रसिद्धीप्रमुख,तालुका उपाध्यक्ष व तालुका सरचिटणीस या पदावर काम केले असून शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्याचे काम अतिशय प्रामाणिकपणे केलेले आहे.पक्षावरील निष्ठा व प्रामाणिकपणे केलेले काम यामुळे मिळालेल्या सरचिटणीस पदाचा जनहितासाठी वापर करेल अशी प्रतिक्रिया सतिश भेगडे यांनी दिली.

सतिश भेगडे यांची मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीसपदी फेरनिवड झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!