ताज्या घडामोडी

पुण्यात पहिल्यांदाच इव्हॉल्व एचआर सोहळ्याचे आयोजन

पुणे :  पुणे शहरात पहिल्यांदाच ‘इव्हॉल्व्ह एचआर सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा ३० एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११-३० ते सायंकाळी ८-०० या वेळेत विमाननगर येथे नोवोटेल (हॉटेल्स आणि रिसॉर्ट) मध्ये पार पडणार आहे.

या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजेच गणेश नटराजन (५ एफ वर्ल्ड कळझुम अडव्हायझर्स आणि सोशल व्हेंचर पार्टनर्स इंडियाचे अध्यक्ष) सकाळी ११-३० ते १२-०० या वेळेत उपस्थित राहणार आहेत.दुपारी १२-३० ते १-३० या वेळेत अमित भोसले (ग्लोबल टॅलेंट ट्रॅक चे ऑपरेशन डायरेक्टर) यांच्यासह सप्तर्षी भट्टाचार्य (हेडटॅलेंट अॅक्विझिशन बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स ) उपस्थित असणार आहेत. त्याचबरोबर क्षितिज अगरवाल ( सीईओ टेकिला ग्लोबल सर्व्हिसेस ) या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत.दुपारी २-०० ते ३-०० या वेळेच्या सत्रात हितेश रामचंदानी (लेखक,मोटिव्हेशनल स्पीकर,पॅरालिम्पिक पदक विजेते) मार्गदर्शन करणार आहेत.

दुपारी ३ ते ४ या सत्रात सय्यद अझफर हुसेन (वरिष्ठ उपाध्यक्ष बजाज फिनसर्व्ह),मंजिरी गोखले-जोशी (संस्थापक संचालिका,माया केअर,यांच्यासह प्रत्युष नंदकेओल्यार (Deutsche बँकेचे ऑपरेशन प्रमुख) उपस्थित असणार आहेत.

सायंकाळी ४-०० ते ५-०० या वेळेत आशिष गायकवाड (व्यवस्थापकीय संचालक,हनीवेल ऑटोमेशन इंडिया.लि.) डॉ.मुक्ता कम्पिकर (हेंड्रिक अँड स्ट्रगल्स,स्वतंत्र सल्लागार),डॉ.संतोष भावे (डायरेक्टर एच आर आणि आय आर भारत फोर्ज लिमिटेड)उपस्थित असणार आहेत.सायंकाळी ५-०० ते ५:३० या कार्यक्रमाच्या समारोपावेळी डॉ.आनंद देशपांडे (व्यवस्थापकीय संचालक पर्सीस्टंट सिस्टम) उपस्थित राहणार आहेत.सायंकाळी ५:३० ते ८:०० या वेळेत पुरस्कार सोहळा आणि नेटवर्किंग सेशन असणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!