ताज्या घडामोडी

तळेगाव स्टेशन येथे रमजान ईद ( ईद-उल- फित्र )उत्साहात साजरी करण्यात आली.

तळेगाव दाभाडे: तळेगाव स्टेशन येथील मस्जिद मध्ये मौलाना मो.शाहीद सिकिलकर यांचे मार्गदर्शना खाली सकाळी 8.30 वा सामूहिक नमाज पठण करण्यात आले .मौलाना साद यांनी रमजान महिन्याचे महत्त्व या विषयावर  मार्गदर्शन केले व सामाजिक सलोखा आणि ईश्वरा प्रति निष्ठा राखण्याचे आवाहन केले तसेच मोठया संख्येने मुस्लिम बांधव नमाज पठण करण्यासाठी उपस्थित होते. या वेळी मुस्लिम जमात ट्रस्ट तर्फे सर्व व्यवस्था करण्यात आली होती. ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष आयुब शिकिलकर यांनी उपस्थिताना शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी उपस्थित तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर सावंत साहेब, व त्यांचे सहकारी स्टाफ यांनी चोख बंदोबस्त करण्यात आले होते. त्याच प्रमाणे नमाज पठण करण्यास आलेल्या समाज बांधवानी ईद निमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष आयुब सिकिलकर ,बाबा मुलानी , जमीर नालबंद, औरंग सादुले ,,नदीम शेख, इरफान आत्तार,इरफान जमादार, त्याच प्रमाणे डॉ मुबारक खान ,पत्रकार अमीन खान अब्दुल हाफीसभाई ,नौशाद शेख , ,इम्रान शेख ,आदी मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!