महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून तब्बल ३५० महिलांनी घेतले महालक्ष्मीचे दर्शन..
तळेगाव दाभाडे :महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून तब्बल ३५० महिलांनी घेतले महालक्ष्मी दर्शन.
येथील रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी चे संस्थापक तसेच नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे विलास काळोखे यांच्या सौजन्याने येथील प्रभाग क्र. ६ मधील महिला भगिनींसाठी कोल्हापूर येथील महालक्ष्मी देवीच्या मोफत दर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
सुमारे ३५० महिलांना यावेळी दर्शनाचा लाभ मिळाला.
दोन वर्षांपासून देवीच्या दर्शनाची आस लागलेल्या सर्व महिलांनी रविवारी दर्शन घेतले. दर्शनाची प्रवासातील सर्व व्यवस्था काळोखे यांनी केली होती.
रविवारी सकाळी सात वाजता तळेगावातून कोल्हापूरच्या दिशेने महिलांना घेऊन बसेस रवाना झाल्या. आमदार सुनिल शेळके तसेच संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे यांच्या हस्ते नारळ वाढवत या प्रवासाचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना आमदार शेळके म्हणाले की “समाजाच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारे विलास काळोखे हे तळेगाव व परिसरात नेहमीच , सांस्कृतिक व आरोग्य विषयक प्रकल्प राबवत असतात.
तसेच सर्व महिलांना दर्शनासाठी शुभेच्छा देत काळोखे यांच्या देखील भविष्यातील राजकीय इच्छा पूर्ण होवोत अशा शुभेच्छा दिल्या. बापूसाहेब भेगडे यांनी देखील यावेळी शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी नगराध्यक्षा कौसल्या काळोखे, तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा शैलजा काळोखे,मनीषा काळोखे, संजय मेहता, बाळासाहेब रिकामे, नितीन शहा व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तुषार काळोखे, रोहिदास काळोखे, कैलास काळोखे, सोमनाथ काळोखे, सुहास काळोखे, महेश बेंजामिन, रुपेश साबळे, संदीप सदावर्ते, रवींद्र साबळे, मयूर काळोखे यांनी यात्रेचे नियोजन यशस्वी पार पाडले.