ताज्या घडामोडी

लोणावळ्यात जगद्गुरू संत तुकाराम या महानाट्याचे ता.२९ रोजी आयोजन ; पोस्टरचे मान्यवरांचे हस्ते अनावरण …

महानाट्याचा रंगमंच १३० फूट लांबीचा १७ फूट उंचीचा आणि शंभर फूट रूंदी असलेला , त्यावर १२ फूट उंचीचे राहीन तसेच रंगमंचावर विठ्ठल मुर्ती

लोणावळ्यात जगद्गुरू संत तुकाराम या महानाट्याचे ता.२९ रोजी आयोजन ; पोस्टरचे मान्यवरांचे हस्ते अनावरण …• लोणावळा ता.४(प्रतिनिधी ) लोणावळ्यात जगद्गुरू संत तुकाराम महाराज या महानाट्याचे ता.२९ रोजी डाॕ.पुरंदरे विद्यालयाचे मैदानावर सायंकाळी ६ वाजता आयोजन करण्यात आले आहे.या महानाट्याच्या पोस्टरचे अनावरण मावळवार्ता फौडेशन चे अध्यक्ष बाबुजी तथा नंदकुमार वाळंज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या महानाट्याचे लेखक , दिग्दर्शक अभिजित भाऊ कडू व उमेश सुभाष दिघे यांचेसह महानाट्याचे प्रस्तुतकर्ता मावळवार्ता फौडेशन चे सर्व पदाधिकारी , नाट्यप्रयोगात काम करणारे कलाकार उपस्थित होते. यावेळी पाटण बोरजचे उपसरपंच दत्ताभाऊ केदारी , मावळवार्ता फौडेशन सचिव बाप्पूलाल तारे , उपाध्यक्ष पप्पू तथा नासिर शेख , कार्यक्रमाचे संयोजक किरणशेठ गायकवाड , शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब फाटक,ज्ञानेश्वर येवले , कार्यक्रम संयोजक नवीन भुरट, मावळवार्ता फौडेशन संस्थापक संजय अडसुळे , विनय विद्वांस , जितेंद्र कल्याणजी , आदीसाह सँदिप वर्तक , वसंतराव भांगरे , हाॕटेल मालक अनिस गणाञा , सर्व पञकार उपस्थित होते. यावेळी महानाट्याचे लेखक , दिग्दर्शक अभिजित कडू माध्यमांशी बोलताना म्हणाले , ” जाणता राजा या महानाट्याचे दिवंगत शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांचे मार्गदर्शनाखाली २००७ पासून २०१२ पर्यत ३५० ते चारशे प्रयोगात आपण शिवशाहिराचे काम केले. .तब्बल दहा वर्षांनी पुन्हा या क्षेत्रात येतोय. हाॕटेल मॕनेजमेंट मधून आर्थिक बाजू भक्कम केली. एनएसएस मधे असताना देहूमधे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे गाथेला चारशे वर्षे पूर्ण झाल्यनंतर पंधरा दिवस झालेल्या धार्मिक कार्यक्रमात स्वयंसेवक म्हणून काम केले होते.पहाटे पाच सहा वाजता इंद्रायणीनदी मधे डुंबून आम्ही या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला ., या महानाट्याचा रंगमंच १३० फूट लांबीचा १७ फूट उंचीचा आणि शंभर फूट रूंदी असलेला , त्यावर १२ फूट उंचीचे राहीन तसेच रंगमंचावर विठ्ठल मुर्ती⋅ असेल. सुमारे १ हजार खुर्च्या या प्रयोगासाठी असतील. मावळवार्ता फौडेशन यांचेकडून प्रस्तुत होणारा हा कार्यक्रम जगात पहिलाच संत तुकाराम महाराज यांचे जीवनावर असेल.
मावळवार्ता फौडेशन चे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री .बाबुजी तथा नंदकुमार वाळंज म्हणाले , ” “या संत तुकाराम महानाट्याचे आयोजन करण्यासाठी कडू आणि दिघे आमच्याकडे आले असता ;त्यांचा अनुभव व स्क्रीफ्ट पाहून हे शिवधनुष्य उचलण्याचे आम्ही मनात घेतले. या कार्यक्रमानिमित्त साडेतीनशे कलाकार असतील. तीनशे स्थानिक कलाकार व पन्नास ते पंचाहत्तर पुण्यातील कलाकार , रंगभूषाकार ,वेषभूषाकार , लाईट , व स्टेजव्यवस्था यावर असतील..
तसेच श्री.वाळंज पुढे म्हणाले , डाॕ.सदाधंद मोरे यांना तसेच जेष्ट किर्तनकार चंद्रकांत महाराज वाळंज , तसेच देहू संस्थानचे विश्वस्थांना या महानाट्याचे बाबत माहिती दिली व परवानगी घेतली … यावेळी सूञसंचालन बाप्पूलाल तारे यांनी केले. किरणशेठ गायकवाड यांनीही मनोगतात महानाट्याचे बाबत मावळवार्ता फौडेशन जीव तोडून हा प्रयोग करत असल्याने पञकार व सर्व लोणावळेकर यांनी यास भरभरून प्रतिसाद द्यावा , असे सांगितले. प्रशोत्तरामधे श्री.अभिजित कडू म्हणाले ,” या महानाट्याच्या भागात छञपती शिवाजी महाराज संत तुकाराम महाराज यांचे कीर्तनात उपस्थित राहतात. तसेच अनेक प्रसंग आहेत.गाथा पाण्यात बुडवतात व ती वरा येते असे प्रसंग आहेत..बैलगाडी , घोडे , गाढव , आदी प्राणी यामधे आहेत. ” यावेळी भरत तिखे , रवि सलोजा हेही उपस्थित होते.आभार नवीन भुरट यांनी मानले…

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!