ताज्या घडामोडी

अक्षय्य तृतीया निमित्त बनेश्वर महादेवाला चंदनउटी

  • अक्षय्य तृतीया निमित्त बनेश्वर महादेवाला चंदनउटी·
    श्री बनेश्वर सेवा मंडळ व नगरसेवक संतोष दादा भेगडे मित्र परिवार यांच्या वतीने अक्षय्य तृतीया निमित्त ऐतिहासिक श्री बनेश्वर महादेव मंदिरामध्ये श्री बनेश्वर महादेवांचा चंदन उटीसोहळा संपन्न झाला. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी गेल्या 22 वर्षांपासून हा चंदन उटी सोहळा संपन्न होत आहे. यावेळी सव्वा दोन किलो चंदनाचा लेप महादेवाला लावण्यात आला आहे. हे ऐतिहासिक बनेश्वर मंदिर सरसेनापती दाभाडे घराण्याचे असून या कार्यक्रमासाठी त्यांचे वंशज श्रीमंत सरदार अंजलीराजे दाभाडे सरकार, श्रीमंत सरदार सत्यशीलराजे दाभाडे सरकार , आमदार सुनील आण्णा शेळके , पुणे महानगर नियोजन समितीचे (PMRDA ) सदस्य नगरसेवक संतोष छबुराव भेगडे, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, नगरसेवक अरुण माने, नगरसेविका शोभाताई भेगडे, प्रचीताई हेंद्रे , इतर माजी नगरसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. चंदन उटी सोहळा संपन्न झाल्यावरती सायंकाळी ७ वाजता नित्य महाआरती करण्यात आली व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री एकतारी भजन झाले यासाठी अनेक गावातून भजनी मंडळे उपस्थित झाली होती. श्री बनेश्वर मंदिरातील महादेवाच्या शिवलिंगाला चंदन उटी केल्याने तसेच त्या भोवती विविध रंगांच्या फुलांची आकर्षक आरास केल्यामुळे ते दृश्य अत्यंत मनमोहक दिसत होते. मंदिरा बाहेरही फुलांची आकर्षक सजावट , मंदिर परिसरात विद्युत रोषणाई व रांगोळी देखील काढण्यात आली होती. अतिशय भक्तीमय वातावरणात हा चंदनउटी सोहळा संपन्न झाला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!