ताज्या घडामोडी
शिलाटणे येथील ज्येष्ठ महिला बबाबाई तुकाराम भानुसघरे (वय-९७) यांचे वृध्दापकाळाने दुःखद निधन.
ज्येष्ठ महिला बबाबाई भानुसघरे यांचे निधन..
लोणावळा शिलाटणे येथील ज्येष्ठ महिला बबाबाई तुकाराम भानुसघरे (वय-९७) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांचे पश्चात सात विवाहीत मुलगे , एक विवाहीत मुलगी , सुना , नातवंडे , पतवंडे , असा परिवार आहे. सचिव संघटना अध्यक्ष गणपत भानुसघरे , माजी सरपंच शिवाजी भानुसघरे , तानाजी भानुसघरे , प्रगतीशील शेतकरी हौजीलाल भानुसघरे , हिरामण भानुसघरे , लक्ष्मण भानुसघरे , आणि मधुकर भानुसघरे हे त्यांचे सुपुञ होत. शिलाटणेच्या माजी सरपंच सौ.संगीता भानुसघरे या त्यांच्या सून होत . आपल्या मनमिळावू व प्रेमळ स्वभावामुळे त्या नातेवाईकांच्या मार्गदर्शक होत्या.