ताज्या घडामोडी

मानसिकता सुंदर जगण्याला जन्म देते! पण त्यासाठी आपल्यालाही बदललं पाहिजे! डॉक्टर शाळीग्राम भंडारी

आम्ही आनंदयात्री – आजच्या गतिमान जगात माणूस अगतिक झाला आहे! अशा या अवस्थेत वृद्धत्व हा कुटुंबाचा आजार नाही तर तो आधार आहे ही– मानसिकता सुंदर जगण्याला जन्म देते! पण त्यासाठी आपल्यालाही बदललं पाहिजे! नव्या-जुन्या मूल्यांचा योग्य मेळ घालून जीवनाचा आनंदयात्री झाल पाहिजे! कारण शेवटी निवृत्ती ही वृत्ती आहे! या वृत्तीत उमेद आणि उपक्रमशीलता असेल तर माणसाला त्याच्या आयुष्याचं ओझं कधीच वाटणार नाही! मित्रांनो या कल्पनेचा अनुभव आम्ही सर्वांनी घेतला तो- दिवस होता- चार मे दोन हजार बावीस! होय मित्रांनो– निमित्त होतं- कलापिनी “हास्ययोगाचा”अठरावा वाढदिवस!- गुरुवर्य अशोकजी बकरे सरांचा वाढदिवस आणि वयाची 75 वर्षे पूर्ण केल्याबद्दल माझ अभिष्टचिंतन! या दिवशी प्रकर्षाने मला आठवले ते नटसम्राट आप्पा- गणपतराव बेलवलकर! आप्पा आपल्या नातीला म्हणतात— सुर म्हणतो साथ दे- दिवा म्हणतो वात दे! उन्हामधल्या म्हातार्‍याला फक्त तुझा हात दे!! होय मित्रांनो– कलापिनी हास्ययोगाने या सर्व ज्येष्ठांना आनंदाचा हात दिला! दिनांक चार मे रोजी– सकाळी साडेसहा ते साडेआठ हे दोन तास – या दोन तासात विविध गुणदर्शनाने परिपूर्ण असलेला कार्यक्रम असा आणि असाच होता की– वठलेल्या झाडालाही पालवी फुटावी असा अलौकिक गुण त्या समारंभात उपस्थितांना क्षणोक्षणी जाणवत होता! यासाठी विशेष परिश्रम घेतले होते– त्यात सौभाग्यवती अंजली सहस्रबुद्धे- बूरसे मॅडम – की ज्यांना पांढरे काकांनी उत्कृष्ट साथ दिली1 या सर्वांना सातत्याने कार्यक्षम ठेवणारे- निष्काम कर्मयोगी- मितभाषी गुरुवर्य अशोकजी बकरे! कलापिनी संस्थेचे चैतन्य- डॉक्टर अनंत परांजपे यांच व्यक्तिमत्व! शायरच्या शब्दात जर व्यक्त करायचं तर ते म्हणतात– जो पुरा ना करसकु वो वादा मै नही करता1 मेरी हैसियतसे बाते जादा नही करता! युतो चांद सितारोको छूनेकी तमन्ना रखता हु! पर औरोको गिरानेका इरादा कभी नही करता! कभी नही करता! समारंभाच्या सुरुवातीला सौ अंजली सहस्रबुद्धे यांनी सर्वांचं स्वागत केलं! डॉक्टर परांजपे यांनी प्रास्ताविक केल्यानंतर ज्येष्ठांनी नृत्य गायन आणि विडंबनात्मक विविध प्रात्यक्षिकातून मनोरंजनातून प्रबोधन केलं! कोकणात पर्यटकांना उत्तम निवासाबरोबरच सुग्रास भोजनाची सेवादेणारे सेवाव्रती शिरीष जोशींनी पत्नीच्या वाढदिवसानिमित्त आपल्या पत्नीचा यथोचित सत्कार स्वीकारला1 त्यानंतर गुरुवर्य अशोकजी बकरे सरांबरोबर माझाही यथोचित सत्कार सन्मान करण्यात आला! प्रमुख अतिथी मानसोपचारतज्ञ डॉक्टर अनिश भट यांनी मनाच्या विविध पैलूवर मार्मिक प्रकाश टाकला! समोरोपात मी म्हणालो की– वृद्धांना या वयात फक्त प्रेमळ संवादाची भूक असते आणि त्यांची ती भूक भागली की त्यांचं आयुष्य हे नवीन पिढीसाठी संस्काराची विद्यापीठ ठरतात! म्हणूनच नटसम्राट म्हणतात– आभाळ म्हणतं सावली दे! जमीन म्हणतं पाणी दे! माळावरल्या म्हाताऱ्याला फक्त तुझी गाणी दे!– एवढीच माफक अपेक्षा या वयात प्रत्येकाची असते हे निर्विवाद सत्य आहे! हे मनोगत व्यक्त करताना– मी काही विनोदाचा -काही काव्य आणि शेरोशायरीचा आधार घेतला! या अत्यंत प्रेरणादायी समारंभास विविध हास्ययोगी मंडळांनी सहभाग घेतला होता त्यात- प्रामुख्याने लायन्स योगाग्रुप आणि तळेगाव स्टेशनवरील हास्ययोग यांचाही समावेश होता! कलापिनीच्या प्रथेप्रमाणे प्रार्थना होऊन  या आनंददायी कार्यक्रमाची सांगता झाली!

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!