ताज्या घडामोडी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना मावळ तालुका अध्यक्ष पद वगळता तालुक्याची कार्यकारणी बरखास्त.

मनसे  मावळ तालुकाअध्यक्ष रुपेश शंकर म्हाळसकर यांनी माहितीदिली .

मावळ तालुका:महाराष्ट्र नवनिर्माण सेना मावळ तालुका अध्यक्ष पद वगळता तालुक्याची कर्यकारणी बरखास्त।।

राजसाहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना मावळ तालुका अध्यक्ष पद वगळता तालुक्याची सध्या अस्तित्वात असणारी मुख्य व सर्व संलग्न अंगीकृत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची पदे व त्यांची कार्यकारणी*  झालेल्या तालुका बैठकीत एकमताने ठराव करून बरखास्त करण्यात आली,असून या पुढे

महाराष्ट्र सैनिक हे पद सर्वांसाठी अबाधित राहील.तसेच कोणीही पूर्वीच्या पदाचा वापर किंवा प्रसार या पुढे करू नये अथवा तसे केल्यास आपण पक्षशिस्त भंगाच्या कारवाईस पात्र ठराल,याची सर्व मनसैनिकांनी नोंद घ्यावी.
त्याचप्रमाणे आज गठीत केलेल्या दहा सदस्यीय कोअर कमिटीचा नियोजित मावळ तालुका दौरा पूर्ण झाल्या नंतरच सर्व सेलची तालुका कार्यकारणी व पदे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते पत्र देऊन नियुक्त केली जाईल असे ठरवण्यात आले.या बैठकीस सचिन चिखले-माजी नगरसेवक पिं-चिं मनपा-प्रभारी मावळ,तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर,सचिन भांडवलकर,सुरेश जाधव,पांडुरंग असवले,अनिल वरघडे,संजय शिंदे, संतोष मोधळे,भारत चिकणे,तानाजी तोडकर,राहुल मांजरेकर,गणेश भांगरे,संदीप शिंदे,किरण गवळी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!